DDSSY | सरकार सर्वसामान्यांवर दीनदयाळ

कोविड उपचारांना योजनेचे कवच

किशोर नाईक गावकर, संपादक | प्रतिनिधी

पणजीः राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजनेत अखेर कोविड-19 वरील उपचारांचा समावेश करण्यात आलाय. यासंबंधीची अधिसूचना आरोग्य खात्याने जारी केलीए. आता कोविड-19 संसर्ग झालेल्या दीनदयाळ कार्डधारकांना सरकारी मान्यताप्राप्त खाजगी इस्पितळात दाखल होऊन उपचार करून घेणं सोपं होणार आहे.

हेही वाचाः CORONA UPDATE | करोना मृतांच्या आकडेवारीत घोळ!; तरुणांचा धक्कादायक अंत

आरोग्य खात्याच्या अतिरिक्त सचिवांकडून अधिसूचना जारी

आरोग्य खात्याचे अतिरीक्त सचिव विकास नाईक गावणेकर यांनी यासंबंधीची अधिसूचना जारी केलीए. ही अधिसूनचा तात्काळ अंमलात आणल्याचंही त्यांनी म्हटलंय. कोविड-19 उपचारांसाठी 8 हजार रूपये प्रतिदिन जनरल वॉर्ड दर निश्चित करण्यात आलाय तसेच व्हेंटिलेटरयुक्त आयसीयुत रूग्णाला दाखल करायचं झालं तर 19,200 रुपये प्रतिदिन दर निश्चित करण्यात आले आहेत. या पॅकेजमध्ये प्रवेश शुल्क, स्पेशलिस्ट तथा प्रायमरी डॉक्टर शुल्क, उपचारांबाबतच्या अन्य प्रक्रिया, औषधे आदींचा समावेश करण्यात आलाय.

हेही वाचाः ‘हळदी डान्स संपला असेल तर पेडणेकडे लक्ष द्या’

इतर विशेष उपचार, आयसीयु व्यतिरीक्त ऑक्सिजन, इतर सर्जरी किंवा उपकरणांचा वापर आदींचा यात समावेश नसेल,असंही यात म्हटलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!