‘चामुंडेश्वरी देवी कृपा कर’ भक्तीगीताचं लोकार्पण

सचिन कुंकळ्येकर आणि विपुल मंगेश घारे यांच्या हस्ते लोकार्पण; समीक्षा भोबे काकोडकर हिच्या आवाजातील गीत

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः श्रावण महिना सुरू झाला, गोव्यातील विविध भागात भक्तीमय वातावरण दिसून येत आहे. राज्यात अजूनही कोरोनाचं संकट असल्यानं पूर्वीप्रमाणे देवळांमध्ये उत्सव, भजन करण्यास परवानगी नाही. तरीदेखील गोव्यातील कलाकार आपल्या तऱ्हेने आपली कला ऑनलाईन माध्यमातून लोकांसमोर सादर करत आहेत. ‘चामुंडेश्वरी देवी कृपा कर’ या भक्तीगीताचं श्रावणातील पहिल्या सोमवारी 9 ऑगस्ट रोजी सचिन कुंकळ्येकर (ओएसडी उपमुख्यमंत्री) आणि विपुल मंगेश घारे (सहाय्यक संचालक, उच्च शिक्षण संचालय) यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं.

हेही वाचाः ACCIDENT | रविवारी कवळे येथे अपघात

समीक्षा भोबे काकोडकर हिच्या आवाजातील गीत

देऊळमळ शिरवई केपे येथील सुंदर निसर्गमय वातावरणात श्री देवी चामुंडेश्वरीचं छोटंसं देऊळ आहे. आणि याच देवीच्या भक्तीने आणि कृपाशीर्वादाने या गीताची रचना माझ्या हातून झाली, असं गीतकार गिरीश आनंद बेणे यांनी सांगितलं. हे गीत गोव्यातील प्रसिद्ध गायिका समीक्षा भोबे काकोडकर हिने आपल्या गोड आवाजात गायलं आहे. गिरीश बेणे यांनी या गीताला चाल दिली आहे, तर सिंधुराज कामत यांच्या स्टुडिओमध्ये या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे.

सोशल मीडियावर गीताला तुफान प्रतिसाद

पहिल्याच दिवसापासून या गीताला उत्तम प्रतिसाद मिळतोय. लोकांना हे गीत आवडल्याने ते सोशल मीडियावर हे गीत शेअर करत आहेत. गीताला तबल्याची साथ अंबेश तळवडकर, पखवाज संघर्ष पालेकर, बासरी सोनिक वेलींगकर, संवादिनी गिरीश बेणे आणि टाळाची साथ वास्तव रिवणकर यांनी केली आहे. या गीताला कोरस युगा सांबारी आणि ध्रीती बेणे यांनी दिलं आहे.

हेही वाचाः सासष्टीत चेन स्नॅचिंगसह मोबाईल हिसकावून पळ काढण्याच्या घटनांत वाढ

विभव परब फिल्म्स यांची व्हिडिओग्राफी

या गाण्याचे व्हिडिओ दिग्दर्शक संदीप रिवणकर असून गीताची व्हिडिओग्राफी विभव परब फिल्म्स यांची आहे. या गीताला गोव्यातील प्रसिद्ध व्यक्तीमत्त्वाचे आशीर्वाद आणि शुभेच्छा मिळाल्या आहेत. ज्यामध्ये पं. उपेंद्र भट, नितीन कुंकळ्येकर, संजय तळवडकर, गोविंद भगत, दयेश कोसंबे, यतिन तळावलीकर , डॉक्टर प्रवीण गावकर आणि इतर कलाकारांचा समावेश आहे.

हा व्हिडिओ पहाः Video | LABOURS | COVID | परप्रांतीय मजुरांची पत्रादेवीत गर्दी

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!