महिलांवरील अत्याचारांत मागील तीन वर्षांत घट

एनसीआरबीचा अहवाल : तपास धिम्या गतीने : न्यायालयांतही अनेक प्रकरणे प्रलंबित

प्रसाद शेट काणकोणकर | प्रतिनिधी

पणजी: २०२० साली मार्च ते डिसेंबर काळात देशात कोविडमुळे लॉकडाऊन होता. अन्य गुन्ह्यांत वाढ झाली असली तरी महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण आधीच्या दोन वर्षांच्या तुलनेत घटले आहे. नॅशनल क्राईम रेकाॅर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) २०२०च्या अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे. राज्यात महिलांवरील अत्याचारांत घट होत आहे. मात्र तपास धिम्या गतीने होत असल्याने न्याय मिळण्याचे प्रमाण कमी आहे, असे या अहवालातून समोर आले आहे.  

राज्यात महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे

राज्यात महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे २०१८ मध्ये ३६२, २०१९ मध्ये ३२९,  तर २०२० मध्ये २१९ नोंद झाली आहेत. राष्ट्रीय गुन्हा नोंदणी विभागाच्या आकडेवारीनुसार, भारतीय दंड संहितेच्या कलमाअंतर्गत २०१८ मध्ये २,७४०, २०१९ मध्ये २,४६५, तर २०२० मध्ये ३,३९३ गुन्हे नोंद आहेत. गोवा बाल कायदा, पोक्सो कायदा, मानवी तस्करी कायदा तसेच इतर स्थानिक कायद्याअंतर्गत २०१८ मध्ये १,१४४, २०१९ मध्ये १,२६२, तर २०२० मध्ये ९७३ गुन्हे नोंद आहेत. दोन्ही कायद्याअंतर्गत मिळून २०१८ मध्ये ३,८८४, २०१९ मध्ये ३,७२७, तर २०२० मध्ये ४,३६६ गुन्हे नोंद आहेत.

२०२० साली २३९ महिलांवरील अत्याचारांचे २१९ गुन्हे नोंद

२०२० साली २३९ महिलांवरील अत्याचारांचे २१९ गुन्हे नोंद आहेत. यात ६१ महिलांवरील बलात्कार प्रकरणी ६०, ७१ महिलांच्या विनयभंगाबद्दल ६७, ८ महिलांनी पतीने किंवा नातेवाईकाने  छळ केल्याप्रकरणी ८, ३३ महिलांच्या अपहरण प्रकरणी ३१, २९ महिलांच्या तस्करीबद्दल १६, ३५ महिलांच्या अपमानावरून ३५, लैंगिक अत्याचार करून खून केल्या प्रकरणी एक, तर सायबर गुन्ह्याखाली अत्याचार केल्याबद्दल एक गुन्हा नोंद आहे.

२०२० मध्ये ६१ लैंगिक अत्याचार प्रकरणी ६० गुन्हे नोंद

२०२० मध्ये ६१ लैंगिक अत्याचार प्रकरणी ६० गुन्हे नोंद आहेत. यात सहा वर्षाखालील मुलीवर अत्याचार केल्याबद्दल २, ६ ते १२ वर्षे वयोगटातील मुलीवर अत्याचाराचे ५, १२ ते १६ वर्षे वयोगटातील मुलींवर अत्याचाराबद्दल २३, १६ ते १८ वर्षे वयोगटातील मुलींवर अत्याचाराबद्दल १२, १८ ते ३० वर्षे वयोगटातील महिलांवर अत्याचार प्रकरणी १२, ३० ते ४५ वर्षे वयोगटातील अत्याचाराबद्दल ५, तर ४५ ते ६० वर्षे वयोगटातील अत्याचाराबद्दल २ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संशयितांपैकी ५९ व्यक्ती पीडितेच्या ओळखीचे तर फक्त एकच संशयित अज्ञात होता. यांतील  ५ संशयित कुंटुबातील सदस्य, २९ मित्र, २५ शेजारी किंवा कौटुंबिक मित्र, तर फक्त एकच व्यक्ती अज्ञात होती, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. 

न्यायालयांत १,७३९ पैकी ७५ खटले निकाली

महिलांवरील अत्याचार प्रकरणांची मागील वर्षाचे १,५६३ तर २०२० मधील १७६ मिळून १,७३९ खटल्यांची विविध न्यायालयांत  सुनावणी घेतली आहे. २०२० मध्ये न्यायालयाने ११ खटल्यांतील आरोपींना शिक्षा ठोठावली, ५८ खटल्यांतील संशयितांची पुराव्याअभावी सुटका केली. ६ खटल्यातील संशयितांची आरोप निश्चित होण्यापूर्वीच सुटका केली.  त्यामुळे २०२०मध्ये ७५ खटले निकालात काढण्यात आले. १,६६४ म्हणजेच ९५.७ टक्के खटले प्रलंबित राहिल्याचे एनसीआरबीच्या अहवालात स्पष्ट केले आहे.          

२१५ पुरुष, १२ महिलांना अटक

२०२० मध्ये २३९ महिलांवर अत्याचार केल्याबद्दल २१५ पुरुषांना आणि १२ महिलांना मिळून २२७ जणांना अटक करण्यात आली. २०२० मध्ये पोलिसांनी मागील वर्षातील प्रकरणात २२५ पुरुष आणि २४ महिला असे एकूण २४९ जणांवर न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. या व्यतिरिक्त २०२० मध्ये न्यायालयाने १५ पुरुष तर ६ महिला मिळून २१ जणांना शिक्षा ठोठावली आहे. त्याच कालावधीत ८ पुरुष आणि २ महिलांना मिळून १० जणांना आरोपमुक्त केले आहे. २०२० मध्ये ८० पुरुष आणि ४ महिला मिळून ८४ जणांना निर्दोष मुक्त केल्याची माहिती एनसीआरबीच्या अहवालातून स्पष्ट झाली आहे.

महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे

वर्षगुन्हे
२०१८३६२
२०१९३२९
२०२०२१९

२०२० वर्षातील नोंद गुन्हे

आरोपसंख्या
बलात्कार६०
विनयभंग६७
कौटुंबिक छळ
अपहरण३१
तस्करी१६
अपमान३५
लैंगिक अत्याचार व खून
सायबर
एकूण२१९

न्यायालयातील खटल्यांची स्थिती

मागील प्रलंबित १,५६३
२०२० मधील १७६
एकूण १,७३९
शिक्षा सुनावणी झालेले ११
पुराव्याअभावी सुटका ५८
आरोप निश्चितीपूर्वी सुटका ६‍
प्रलंबित १,६६४ 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!