अनेक सार्वजनिक मंडळांचा दीड दिवस उत्सवाचा निर्णय

सार्वजनिक गणेशोत्सवावर करोनाचे सावट : सांस्कृतिक कार्यक्रमांना फाटा देऊन धार्मिक विधींवर भर

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही गणेश चतुर्थी उत्सवात करोनाचे विघ्न असल्यामुळे राज्यातील अनेक सार्वजनिक गणेशात्सव मंडळांनी दीड दिवस, तर काही मंडळांनी ११ दिवस उत्सव साजरा करण्याचं ठरवलं आहे. बहुतांश मंडळांनी उत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन न करता फक्त धार्मिक वि​धी करण्याचं ठरवलं आहे.

हेही वाचाः निवडणुकीच्या दोन महिने आधी काँग्रेस उमेदवारांची घोषणा

गेल्या दीड वर्षापासून करोनामुळे सांस्कृतिक कार्यक्रम बंद आहेत. गोमंतकीयांचा सर्वांत मोठा सण गणेश चतुर्थी अवघ्या १५ दिवसांवर आला आहे. कराेनाचं सावट कायम असल्यानं चथुर्तीचा उत्साह हरवलेला आहे. सार्वजनिक मंडळे, व्यापारी संघटना, सांस्कृतिक संस्था, पोलीस कार्यालये आदी संघटनांकडून सार्वजनिकरीत्या चतुर्थी साजरी केली जाते. अनेक मंडळे ७, ९, ११ तसंच २१ दिवस गणेशपूजन करतात. दरवर्षी उत्सवात वि​विध सांस्कृतिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमांची रेलचेल असते. गेल्या वर्षी करोनामुळे अनेक मंडळांनी फक्त दीड दिवस साधेपणाने उत्सव साजरा केला. यंदाही अनेक मंडळांनी दीड दिवस गणेशपूजन करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षीही सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद घ्यायला मिळणार नाही.

राज्यात घरोघरीही गणपतीचं पूजन मोठ्या भाक्तीभावाने केलं जातं. दीड, ५, ७, ९ व ११ दिवस गणेशाचं पूजन केलं जातं. गेल्या वर्षी करोनामुळे अनेकांनी दीड दिवस गणपतीची पूजा केली होती. गणपती विसर्जन मिरवणूक काढणेही अनेकांनी टाळलं होतं. त्यामुळे भजन, आरती, फुगडी असे सार्वजनिक कार्यक्रम झाले नाहीत. यावर्षीही सार्वजनिक कार्यक्रम आयोजित केले जाण्याबाबत शंका आहे. गणेश चतुर्थी १५ दिवसांवर आली तरी नेहमीसारखं वातावरण तयार झालेलं नाही. बाजारात चातुर्थीचं साहित्य दाखल झालेलं नाही. करोनाच्या सावटामुळे चतुर्थीच्या काळात भरणाऱ्या फेऱ्याही यंदाही भरतील की नाही, हे सांगता येत नाही.

हेही वाचाः काबूल विमानतळावर चेंगराचेंगरी; सात जणांचा मृत्यू

या वर्षीही दीड दिवसच उत्सव साजरा केला जाणारः अशोक पाटील

आम्ही दरवर्षी पणजी चर्चजवळील गार्डनमध्ये ११ दिवस गणेशोत्सव विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजारा करत असतो. गेल्या वर्षी करोनामुळे उत्सव फक्त दीड दिवस साजरा केला. या वर्षीही दीड दिवसच उत्सव साजरा केला जाणार आहे. फक्त धार्मिक विधी केले जाणार असून सांस्कृतिक कार्यक्रम केले जाणार नाहीत. करोना नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाणार आहे, असं पणजीतील पणजीकर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष अशोक पाटील म्हणाले.

हेही वाचाः सिद्धी नाईकच्या मृत्यूप्रकरणी ‘लव्ह ट्रॅन्गल’चा पोलिसांकडून शोध

फक्त धार्मिक विधी करून गणेशोत्सवः तुषार टोपले

म्हापशातील सार्वजनिक गणेशोत्सव हा गोव्यातील मोठा उत्सव आहे. दरवर्षी ११ दिवस वि​विध सांस्कृतिक कार्यक्रमांनी हा उत्सव साजरा केला जातो. गेल्या वर्षी करोनामुळे फक्त ५ दिवस उत्सव साजरा झाला. या वर्षी नुकत्याच झालेल्या बैठकीत अनंत चतुर्दशीपर्यंत म्हणजे १० दिवस उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात सांस्कृतिक कार्यक्रम होणार नाहीत. फक्त धार्मिक विधी केले जातील. करोनाविषयक मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन केलं जाणार आहे, असं म्हापशातील म्हापसा सार्वजानिक गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष तुषार टोपले म्हणालेत.

हा व्हिडिओ पहाः VIDEO | CABO DE RAMA FORT | काब द राम किल्ल्यावर कुणाचा कब्जा ?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!