स्वयं अपघातात डिचोलीतील युवकाचा मृत्यू

मंगळवारची घटना; प्रतापनगर हरवळे येथे अपघात

विशांत वझे | प्रतिनिधी

डिचोलीः प्रतापनगर हरवळे येथे एका दुचाकीला झालेल्या स्वयं अपघातात सखळीतील एक ३६ वर्षीय युवक जगीच ठार झाला. मयताचे नाव प्रसाद लक्ष्मीकांत शिरोडकर असे असून घरी पोहोचण्यासाठी ५० मीटर अंतरावर असतानाच सदर अपघात घडला.

हेही वाचाः …तर त्यांची नग्न अवस्थेत धिंड काढा !

कधी झाला अपघात?

सदर अपघात मंगळवारी २७ जुलै रोजी दुपारी २.३० वा. च्या सुमारास झाला. प्रसाद शिरोडकर हा आपल्या दुचाकीने (क्र. जीए ०४ सी २६९१)  घरी येत असताना केवळ अवघ्याच अंतरावर काळाने त्यांच्यावर झडप घातली. वाहनावरील ताबा सुटल्याने त्याची दुचाकी रस्त्याशेजारील कुंपणाला धडकली. या घटनेत तो जागीच ठार झाला.

हेही वाचाः KARNATAKA NEW CM | कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री ठरले

तातडीने हलवले साखळी सामाजिक आरोग्य केंद्रात

या घटनेनंतर लगेच १०८ रूग्णवाहिकेला संपर्क करण्यात आला आणि त्याला लागलीच साखळी सामाजिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आलं. मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. पोलिसांनी या घटनेच पंचनामा करून मृतदेह बांबोळी येथे गोमेकॉत उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. आज उत्तरीय तपासणीअंती मृतदेह घरच्यांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.

हेही वाचाः ढवळीकरांनी मतदारसंघातील नेटवर्कची समस्या सोडवावी

पोलिसांचा तपास सुरू

या प्रकरणी डिचोली पोलीस निरिक्षक महेश गडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक किशोर रामानंद अधिक तपास करीत आहे. प्रसाद शिरोडकर हा अविवाहित आणि सुस्वभावी युवक होता. त्याचा निधनाने साखळीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

हा व्हिडिओ पहाः Video | FREE INTERNET FOR EDUCATION |मगो नेते प्रवीण आर्लेकर यांची विद्यार्थ्यांसाठी मोफत WIFI सुविधा

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!