डिजिटल मीटर, जीपीएससाठी अंतिम मुदत

२० मे पासून ३० ऑक्टोबर पर्यंत वेळापत्रक जाहीर

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: राज्य सरकारने नोटीस जारी करून २० मे पासून ३० ऑक्टोबर पर्यंत राज्यात डिजिटल मीट, जीपीएस यंत्रणा बसवण्यासंदर्भात वेळापत्रक जाहीर करून अंतिम मुदत दिली आहे. याची दखल घेऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने वाहतूक संचालकाला १७ सप्टेंबरपर्यंत किती जणांवर कारवाई केली त्याचा स्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देश जारी केले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी २० सप्टेंबर रोजी होणार आहे.

हेही वाचाः आता वाहन चालवण्यासाठी आवश्यक शिकाऊ परवाना मिळणार ऑनलाईन

टीटीएजीने दुसऱ्यांदा अवमान याचिका दाखल केली

राज्यात पर्यटक टॅक्सींना डिजिटल मीटर, जीपीएस यंत्रणा लागू करण्याबाबत ट्रॅव्हल अँड टुरिझम असोसिएशन ऑफ गोवा (टीटीएजी) या संघटनेने २०१६ साली गोवा खंडपीठात मूळ याचिका दाखल केली होती. त्यानंतर खंडपीठाने राज्यात यंत्रणा लागू करण्यासंबंधी अनेक निर्देश देऊन ५ जुलै २०१ ९ रोजी याचिका निकालात काढली होती. असं असताना राज्यात यंत्रणेची अंमलबजावणी झाली नसल्यानं टीटीएजीने दुसऱ्यांदा अवमान याचिका दाखल केली आहे. याची दखल घेऊन खंडपीठाने राज्यात यंत्रणाची अंमलबजावणी करण्याचा निर्देश जारी केला होता. त्यानुसार, राज्यात यंत्रणा लागू करण्यासाठी वाहतूक खात्याने २० मे पासून डिजिटल मीटर, जीपीएस यंत्रणा बसावण्यासंदर्भात वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्यानुसार यंत्रणा न बसवलेल्या किती जणांवर कारवाई केली आहे, याबाबत स्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देश खंडपीठाने जारी केला आहे.

हेही वाचाः कोरोना ? छे…साधं सर्दी-पडसं ; ‘या’ देशात आता नवे नियम !

डिजिटल मीटर, जीपीएस यंत्रणा बसवण्याबाबत वेळापत्रक

वाहन नोंदणी अंतिम क्रमांकयंत्रणा बसवण्याचा कालावधीपरवाना रद्द तारीख
० किंवा १1 जुलै ते २४ जुलै २०२१२५ जुलै २०२१
२ किंवा ३२६ जुलै ते १८ ऑगस्ट २०२११९ ऑगस्ट २०२१
४ किंवा ५१९ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर २०२११२ सप्टेंबर २०२१
६ किंवा ७१३ सप्टेंबर ते ०६ ऑक्टोबर २०२१०७ ऑक्टोबर २०२१
८ किंवा ९७ ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर २०२१नोव्हेंबर २०२१  
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!