‘फिश हेड’ न वाढल्यानं लग्नमंडपातच ‘फ्री स्टाईल’

बिहारमधील लग्नातला प्रकार ; 11 जण गंभीर जखमी

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : बिहारमधील गोपाळगंजमध्ये एक आश्चर्यकारक प्रकार समोर आला आहे. या ठीकाणी वऱ्हाडी एकमेकांशी भिडले. त्यांच्यात तुफान हाणामारी झाली. यामध्ये ११ लोक गंभीर देखील झाले. जेवणात आवडता पिस म्हणजेच माशाचे डोके न भेटल्याने ही हाणामारी झाली. ही घटना सिसई टोला भटवालिया गावची आहे.

वऱ्हाड्यांना जेवणात मासे आणि भात देण्यात आला होता. त्याचवेळी काही वऱ्हाडी ‘फिश हेड’ वाढण्याची मागणी करत होते. मात्र, ‘फिश हेड’ संपल्यामुळे त्यांना वाढता आले नाही. त्यामुळे वऱ्हाडी चांगलेच संतापले. सुरुवातीला त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसोबत वाद-विवाद झाले. त्यानंतर लवकरच हा वाद-विवाद हाणामारीत बदलला.

लग्नाच्या कार्यक्रमात खुर्च्या फेकल्या जाऊ लागल्या. या हिंसक हाणामारीत ११ लोक जखमी झाले. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि प्रत्येकाची वेगवेगळी विधाने नोंदविली. हथुआ उपविभागीय अधिकारी नरेश कुमार म्हणाले की, दोन्ही बाजूंकडून चौकशी केली जात आहे. दरम्यान, यापुर्वी बिहारमध्ये अशा घटना घडल्या आहेत. लग्नसमारंभात खाण्यावरून वाद झाल्याची ही पहिली वेळ नाही. यापुर्वी जेवणात चिकन न वाढल्यामुळे गोळीबार झाला होता. आता फिश करीवरुन वाद झाले आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!