DDSSY SCHEME | कोरोना रुग्णांना आता ‘डीडीएसएसवाय’चा आधार

आता खासगी रुग्णालयांमध्ये कोव्हिड-१९ उपचारासाठी घेता येणार 'डीडीएसएसवाय'चा लाभ

धनश्री मणेरीकर | प्रतिनिधी

पणजीः राज्य वैद्यकीय विमा योजना, दीनदयाळ स्वास्थ्य सेवा विमा योजना (डीडीएसएसवाय) अंतर्गत मिळणारा संरक्षणाचा लाभ आता खासगी रुग्णालयांमध्ये कोविड-19 उपचारासाठी रुग्णांना घेता येणार असल्याचं मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी जाहीर केलं. बुधवारपासून या योजनेच्या सेवेची अंमलबजावणी करण्यात आल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

vlcsnap-2021-04-28-16h44m39s773
vlcsnap-2021-04-28-16h44m39s773

खासगी इस्पितळात उपचारांसाठी 70 ते 80 टक्के रक्कम

सरकारने गोंयकारांच्या आरोग्याचं रक्षण करण्यासाठी दीनदयाळ स्वास्थ्य सेवा विमा योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत खासगी रुग्णालयात छोटे – मोठे उपचार, शस्त्रक्रियेसाठी प्रत्येकी साडेतीन ते चार लाख रुपये विमा देण्यात येत होते. आता या योजनेंतर्गत कोरोना रुग्णांना खासगी इस्पितळात उपचारांसाठी 70 ते 80 टक्के रक्कम विम्यांतर्गत मिळणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

खासगी रुग्णालयांना पुढे येण्याचं आवाहन

कोव्हिड-19 साठी उपचार देण्यास खासगी रुग्णालयांनी पुढे यावं. तसंच डीडीएसएससी योजनेचा भाग नसलेल्या रुग्णालयांनी या योजनेत सामील व्हावं, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं. सरकारी रुग्णालयांवरील आर्थिक बोजा लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला. गुरुवारी कोविड-19 चाचण्यांची उरलेली कामं पूर्ण होतील आणि शुक्रवारपासून कोव्हिड-19 चाचणीचे निकाल 24 तासांच्या आत मिळण्यास सुरुवात होईल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

हेही वाचाः लस नोंदणीचे Cowin App पोर्टल अन् आरोग्य सेतू अ‍ॅप पहिल्यात दिवशी क्रॅश

कोविड रुग्णांच्या उपचारांसाठी कृपया पुढे या

सध्या  मडगावातील चार प्रसिद्ध खासगी  पल्मोनोलॉजिस्ट आणि छाती चिकित्सक सरकारी रुग्णालयांमध्ये स्वेच्छेने सेवा देण्यासाठी पुढे आले आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) सदस्यांना आणि इतर डॉक्टर्सना कोविड रुग्णांच्या उपचारांसाठी स्वेच्छेने पुढे येण्याची विनंती यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली.

हेही वाचाः लॉकडाऊनच्या निर्णयाचे स्वागत, पण…

नियमांचं पालन करा आणि औषधोपचार करा

कोविडची लक्षण असलेल्या लोकांनी त्यांचे रिपोर्ट मिळण्यापूर्वीच घरी विलगीकरणात राहावं. त्याचप्रमाणे राज्य सरकारने सांगितलेली होम आयझोलेशन नियमावालीचं पालन करावं आणि सांगितलेले औषधोपचार सुरू करावेत. जर तुम्ही राज्य सरकराच्या नव्या कोविड-19 नियमावलीचं पालन केलं, सांगितलेले औषधोपचार केलेत, तर रुग्णालयात दाखल होण्याची वेळ तुमच्यावर येणार नाही. एसओपीचं पालन करत तुम्ही स्वत: स्वतःचे उपचार सुरू करू शकता. तसंच कोविड-19ची तीव्र लक्षणं असलेल्या घरी न राहता जवळच्या रुग्णालयात लगेच दाखल व्हावं, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी गोंयकारांना केलं.

हेही वाचाः COVID UPDATE | HOME ISOLATION SOP | घरी विलगीकरणात असलेल्यांसाठी नवी मार्गदर्शक तत्त्वं

राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा नाही

सध्या 90-93 कोविड रुग्ण बांबोळीतील गोवा मेडिकल कॉलेज (जीएमसी)मध्ये व्हेंटिलेटरवर आहेत आणि 24 तासांच रुग्णालयात असलेल्या किमान 19 कोविड रुग्णांचा मृत्यू होतोय. गोव्यात ऑक्सिजनचा तुटवडा नाही. राज्यासाठी यापूर्वीच अकरा मेट्रिक टन ऑक्सिजन मंजूर करण्यात आला आहे आणि आम्हाला केंद्राकडून आणखी 20 मेट्रिक टन मिळणार आहे. राज्यात ऑक्सिजनचे चार प्लांट्स आहेत. यापैकी वेदांताने ऑक्सिजनचा मोफत पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधानांच्या हस्तक्षेपाद्वारे आम्हाला अतिरिक्त पुरवठा मिळणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!