POLITICS | जखम मोठी होण्याआधी ती नष्ट करणं गरजेचं

मांद्रेकरांची लोबोंवर टीका

Goan Varta Live | प्रतिनिधी

म्हापसा: सरकारातील एक मंत्री शिवोली मतदारसंघातून येऊन पक्षविरोधी कारवाया करीत आहेत. पण पक्षाकडून संबंधित मंत्र्यांवर कारवाई होताना दिसत नाही. जखम मोठी होण्याआधी मलमपट्टी करून ती नष्ट करणं गरजेचं आहे असं म्हणत, माजी मंत्री तथा शिवोलीचे माजी आमदार दयानंद मांद्रेकर यांनी भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आणला.

हेही वाचाः काय भुललासी वरलीया रंगा

गेल्या काही महिन्यांपासून लोबो आणि त्यांच्या पत्नी शिवोलीत अधिक सक्रिय

भाजप सरकारात मंत्री असलेल्या मायकल लोबो यांनी काही महिन्यांपासून शिवोली मतदारसंघावर डोळा ठेवला आहे. आपली पत्नी डिलायला लोबो या मतदारसंघात सक्रिय असल्याचंही त्यांनी अगोदरच स्पष्ट केलं आहे. शिवाय डिलायला शिवोलीतून विधानसभा निवडणूक लढवू शकतात, असे संकेतही त्यांनी दिले आहेत. त्यातच गेल्या काही महिन्यांपासून लोबो आणि त्यांच्या पत्नी शिवोलीत अधिक सक्रिय झाल्याचं दिसून येत असल्यानं माजी मंत्री मांद्रेकर यांनी मंगळवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासमोरच लोबो यांचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला.

सरकारातील मंत्र्याकडून शिवोलीत पक्ष विरोधी कारवाया

सरकारातील एक मंत्री शिवोलीत येऊन पक्ष विरोधी कारवाया करीत आहे. या मंत्र्यांवर पक्षाने योग्य कारवाई करण्याची गरज आहे. या मंत्र्याची शिवोलीत चाललेली लुडबूड आपल्या कार्यकर्त्यांनी अनेकवेळा आपल्या निदर्शनास आणून दिली आहे. आता आपण ती मुख्यमंत्र्यांच्या नजरेस आणून देत आहे, असंही मांद्रेकर यांनी नमूद केलं.

हा व्हिडिओ पहाः Update | Doctor’s Safety | डॉ. तिळवे मारहाणप्रकरणी अखेर तिघांना अटक

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!