महाविद्यालयीन परीक्षांच्या तारखा विद्यापीठाकडून जाहीर

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजीः राज्यात कोविड महामारी सुरू झाल्यापासून सगळे व्यवहार ठप्प झालेत. शैक्षणिक क्षेत्रावरही कोविड महामारीने चांगलाच परिणाम केलाय. गेलं दीड वर्षं शाळा, महाविद्यालये बंद आहेत. यंदा दहावी-बारावीच्या परीक्षादेखील रद्द करण्यात आल्यात. मात्र महाविद्यालयीन परीक्षांच्या तारखा लागल्यात. गोवा विद्यापाठीने परिपत्रक जारी करून महाविद्यालयीन परीक्षांच्या तारखा जाहीर केल्यात.
हेही वाचाः काँग्रेस पक्षाचे इंधन दरवाढी विरोधात धरणे आंदोलन
कधीपासून परीक्षा?
गोवा विद्यापीठाकडून जारी करण्यात आलेल्या परीपत्रकानुसार जुलै महिन्यात महाविद्यालयीन परीक्षा घेण्यात येणार असल्याचं जाहीर केलंय. जुलै महिन्याच्या 9 तारखेला परीक्षा सुरू होणार असून ते ऑगस्ट 14, 2021 पर्यंत चालणार असल्याचं परीपत्रकात सांगितलंय. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करावी लागणारेय.
हेही वाचाः CORONA UPDATE | दिलासादायक! रुग्ण संख्या घटली; रिकव्हरी रेट वाढला
परीक्षानंतर सुट्टी
9 जुलै ते 14 ऑगस्टपर्यंत परीक्षा चालणार असून यानंतर विद्यार्थ्यांना सुट्टी देणार असल्याचं गोवा विद्यापीठाने परीपत्रकात म्हटलंय. सुट्टीचा हा कालावधी 16 ऑगस्टपासून सुरू होणार असून पुढे तो 31 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. मात्र त्यानंतर पुढील शैक्षणिक वर्षं सुरू होणार असल्याचं परीपत्रकात नमूद केलंय.
हेही वाचाः Vaccine सर्टिफिकेटवर झाली असेल चूक, तर घाबरू नका…
पुढील शैक्षणिक वर्षं सप्टेंबरपासून
परीक्षा आणि सुट्ट्या संपल्यानंतर सप्टेंबर महिन्यात पुढील शैक्षणिक वर्षं सुरू करणार असल्याचं गोवा विद्यापीठाने सांगितलंय. हे शैक्षणिक वर्षं सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच १ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.