ऑनलाईन शाळेला मोबाईल नेटवर्कचीच ‘दांडी’

साखळी मतदार संघातील सुर्ला पाळी परिसरात विद्यार्थी-पालक त्रस्त

विनायक सामंत | प्रतिनिधी

डिचोली : साखळी मतदार संघातील सुर्ला पाळी आदी भागात शालेय विद्यार्थ्यांना नेटवर्क अभावी अभ्यासात व्यत्यय येतो आहे. सुर्ला गावात २ टॉवर असूनही या गावात काही भागांमध्ये नेटवर्कची मारामार आहे. ऑनलाईन शाळेत मुलांची हजेरी कंपल्सरी केली असून नेटवर्क नसल्याने शिक्षकांनी पाठविलेले वर्ग भरण्याचे मेसेज मुलांपर्यंत उशीरा पोचत असल्याने त्यांचे वर्ग चुकले जातात, अशी माहिती सुभाष फोडेकर यांनी दिली.

शिक्षक आपले धडे पुर्ण करण्याचा मागे असतात, पण मुलांना आलेल्या समस्या शिक्षकांना विचारता येत नाहीत. “शिक्षक सगळं शिकवतात पण आम्हाला त्यांना प्रश्न विचारणार तर रेंजच नसते” असं इशा सुरलकर, पवित्रा नाईक आदींनी सांगितले.

सुर्ला पंचायतीने याबाबत सरकारकडे अजून टॉवर्स गावात लावण्याची विनंती केली आहे. जेणेकरून मुलांची गैरसोय होवू नये, याची खबरदारी घेण्यासाठी किमान दोन नवे टॉवर्स उभारण्याची गरज आहे, असे गोपाळ सुर्लकर यांनी सांगितले. थोडा वेळ येते, बराच वेळ जाते. आता शाळेत मुलांना ऑनलाईन नियमित हजर राहायचे बंधन असल्यामुळे चांगले नेटवर्क हवे, मात्र खूप वेळा रेंज नसल्याने रोज वर्गावर परिणाम होत असतो.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!