सत्तरीत डोंगर कोसळल्याने जैविक संपत्तीचं नुकसान

चार ठिकाणी कोसळले डोंगर; मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल झाल्याने डोंगर कोसळण्याचे प्रकार

Goan Varta Live | प्रतिनिधी

वाळपईः सत्तरी तालुक्याच्या इतिहासामध्ये यंदा प्रथमच झरमे, करंझोळ, साटरे आणि करमळी बुद्रुक या भागातील डोंगर कोसळण्याचे प्रकार घडले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जैविक संपत्तीची हानी झाली. सदर कोसळलेल्या डोंगरामुळे अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण झालेत. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून डोंगराळ भागांमध्ये मोठ्या प्रमाणात होणारी झाडांची कत्तल वन खात्यातर्फे व्यवस्थित प्रमाणात रान व्यवस्थापन हाती घेण्यात न आल्यामुळे हा प्रकार घडत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत यासाठी आतापासूनच उपाययोजना करणं अत्यंत गरजेचं आहे. सध्यातरी ज्या ठिकाणी डोंगर कोसळला आहे तिथे मोठ्या प्रमाणात जंगल संपत्ती आणि काजू बागायतीची हानी झालेली आहे.

हेही वाचाः एक कोटीच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण

एकूण चार ठिकाणी डोंगर कोसळण्याचा प्रकार

याबाबतची माहिती अशी की सत्तरी तालुक्यातील एकूण चार ठिकाणी डोंगर कोसळण्याचा प्रकार घडला आहे. यापूर्वी अशा प्रकारचा प्रकार घडला नव्हता. त्यामुळे आत्ताच घडलेल्या या प्रकारामुळे अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण झालेत. झरमे, करंझोळ, कुमठोळ, साटरे आणि करमळी या ठिकाणी डोंगर कोसळण्याचा प्रकार घडला आहे. मात्र प्राथमिक अंदाजानुसार मोठ्या प्रमाणात डोंगराळ भागातील झाडांची कत्तल होऊ लागली आहे. यामुळे जमिनीमध्ये पाणी धारण करण्याची क्षमता  न झाल्यामुळे डोंगराळ भागांमध्ये पाणी उपलब्ध न होता कोसळणाऱ्या पावसाच्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर माती खाली येऊन हा प्रकार घडू लागला आहे. मोठ्या प्रमाणात जंगलाची तोड होऊ लागली आहे. यावर उपाय योजना करण्यात वनखात्याची यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरली आहे. यामुळे आज प्रचंड प्रमाणात भूगर्भाचं नुकसान होताना दिसत आहे.

मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल

प्राप्त माहितीनुसार सत्तरी तालुक्याच्या अनेक डोंगरावर आजही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेलं आहे. या अतिक्रमणाच्या माध्यमातून या डोंगरावर असलेली मोठ्या प्रमाणात अनेक वर्षाचा इतिहास सांगणारी झाडे कापण्यात आली आणि त्या ठिकाणी काजूची लागवड करण्यात आली. मोठ्या प्रमाणात जंगलतोड झाल्यानंतर जमिनीमध्ये पाणी धारण करण्याची क्षमता कमकुवत झाली. यामुळे हा प्रकार घडल्याचा प्रथमदर्शी अंदाज नागरिकांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचाः पुरामुळे धारबांदोड्यात दोन कोटींचं नुकसान

मोठ्या प्रमाणात काजू बागायतीचं नुकसान

सध्यातरी झरमे, करमळी, करंझोळ आदी भागातील डोंगर कोसळल्यामुळे मोठ्या प्रमाणात काजू बागायतीचही नुकसान झालंय. अनेकांच्या काजू बागायतीमध्ये डोंगर कोसळल्यामुळे झाडं मातीमध्ये गाडली गेली आहेत. यामुळे प्रचंड प्रमाणात आर्थिक समस्या निर्माण झाली आहे. मात्र एकाएकी घडलेल्या या प्रकारामुळे अनेक ठिकाणी भीतीचं वातावरण पसरलं आहे. कारण अशाप्रकारे नैसर्गिक आपत्तीचे प्रकार येणाऱ्या काळातही घडू शकतात. यामुळे कडक उपाय योजना करणं अत्यंत गरजेचं बनलं आहे. सत्तरी तालुक्याच्या डोंगराळ  भागांमध्ये मोठ्या प्रमाणात होणारी जंगल संपत्तीची हानी याकडे दुर्लक्ष करण्यात आलं आहे. यामुळे अशा प्रकारच्या घटना घडू लागल्या आहेत. यावर उपाययोजना करण्यासाठी कशाप्रकारे सरकारची यंत्रणा काम करणार याकडे आता लक्ष लागलं आहे.

हा व्हिडिओ पहाः Video | MAJOR PORT LAW | हा कायदा गोव्याचं अस्तित्व संपवणारा- कॉंग्रेस

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!