संरक्षक भिंत कोसळून ७ गाड्यांची हानी

आके येथील दुर्घटना: सुमारे दोन लाखांचे नुकसान

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगाव: आके मडगाव येथील वीज कार्यालयाची भिंत कोसळल्याने सुप्रीम पार्क बी या इमारतीतील एका कारसह सहा दुचाकी अशा एकूण सात गाड्यांचं नुकसान झालं. अग्निशामक दलाच्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली असून गाड्यांचं सुमारे दोन लाखांचं नुकसान झालं आहे.

हेही वाचाः कोविडमुक्तीनंतर किमान ४५ दिवस विश्रांती हवी

संरक्षक भिंतीच्या बाजूला उभ्या केलेल्या गाड्यांचं नुकसान

आके मडगाव येथील वीज कार्यालयाच्या बाजूलाच सुप्रीम पार्क बी को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे. शुक्रवारी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे सायंकाळी ७च्या सुमारास वीज कार्यालयाची संरक्षक भिंत कोसळली. ही भिंत रहिवासी इमारतीच्या बाजूला कोसळल्याने संरक्षक भिंतीच्या बाजूला उभ्या केलेल्या गाड्यांचं नुकसान झालं.

हेही वाचाः बुधवारपर्यंत मुसळधार; सतर्क राहण्याच्या नागरिकांना सूचना

1 कार, 6 दुचाकींचं नुकसान

या दुर्घटनेमध्ये एका कारच्या दरवाजाचं नुकसान झालं असून सहा दुचाकींवर भिंत कोसळल्याने त्यांचीही मोडतोड झाली. सुमारे तीन लाखांची मालमत्ता वाचवण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!