19 वर्षाच्या तरुणासह सलग तिसऱ्या दिवशी राज्यात 39 कोरोना बळी!

दिलासादायक बाब म्हणजे पॉझिटिव्हिटी रेटमध्ये घट

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

ब्युरो : राज्यात सलग तिसऱ्या दिवशी ३९ कोरोना बळी गेल्याची नोंद करण्यात आली आहे. २५ मे आणि २६ मेनंतर आता सलग तिसऱ्या दिवशी कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा ३९ असल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बळींची संख्या ही आता अडीच हजाराच्या पार गेली आहे. आहे. राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत २ हजार ५३८ कोरोना रुग्णांचा बळी गेला आहे.

corona update

कुठे किती मृत्यू?

दरम्यान, गुरुवारी जीएमसीत २३, दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयामध्ये ८ रुग्ण दगावल्याची नोंद करण्यात आली आहे. तर दक्षिण गोव्यातील खासगी रुग्णालयात ५ तर उत्तर गोव्यातील खासगी रुग्णालयात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, मृत्यू झाल्यानंतर दोघांना उपचारासाठी रुग्णालयात आणल्याचीही नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, गुरुवारी मृत्यू झालेल्यांपैकी चौघांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्याचीही माहिती मिळतेय.

हेही वाचा : सुरुवातीला लॉकडाऊन केला असता, तर आज राज्याचं चित्र वेगळं असतं

१९ वर्षीय तरुणाचाही मृत्यू

दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका तरुणांना बसत असल्याचं पाहायला मिळतंय. गुरुवारी एका १९ वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. तर गुरुवारी झालेल्या मृतांमध्ये १० जणांचं वय हे ५० पेक्षा कमी असल्याचं पाहायाल मिळलंय.

मृत्यूदर चढाच! पण तरिही दिलासा?

एकीकडे राज्यातील मृत्यूदर कमी होत असला तरी राज्यातील कोरोना रुग्णवाढीचा वेग काही प्रमाणात मंदावला आहे. तर दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढलंय. अशातच पॉझिटिव्हिटी रेटमध्ये घट झाल्याचं पाहायला मिळतंय. अर्थात कोरोना चाचण्या जरी कमी झालेल्या असल्या तरीही एकूण आकडेवारी पाहता राज्याचा रिकव्हरी रेटही सुधारल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे ही आकडेवारी एकप्रकारे दिलासादायक असल्याचं दिसून येतंय.

हेही वाचा : कर्फ्यू काळात सामान खरेदीसाठी गर्दी; गर्दीवर नियंत्रण आवश्यक

गुरुवारी राज्यात १ हजार ५०४ नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. गुरुवारी एकूण १ हजार ५५७ रुग्ण कोरोनातून बरे झाले असून एकूण १४१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला आहे. तर नव्यानं आढळलेल्या रुग्णांपैकी १४८ रुग्णांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. तर दुसरीकडे होम आयसोलेशनमध्ये १ हजार ३५६ रुग्ण आहेत. सध्याच्या घडीला राज्यात सक्रिय रुग्णसंख्या ही १५ हजार ६९९ इतकी नोंदवण्यात आली आहे.

हेही वाचा : शंभर टक्के लसीकरणासाठी मुख्यमंत्री आग्रही

राज्यात गुरुवारी एकूण ५ हजार ९५१ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. चाचण्यांच्या मानानं आढळलेल्या रुग्णसंख्येकडे पाहता राज्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा 25.27 टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!