सलग दुसऱ्या दिवशी राज्यात 6 रुग्ण दगावले!

बरे होणाऱ्यांपेक्षा नवे रुग्ण सलग दुसऱ्या दिवशी जास्त

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : सलग दुसऱ्या दिवशी राज्यात कोरोनामुळे 6 रुग्ण दगवाले आहेत. त्यामुळे राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत 3 हजार 60 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तर नव्या रुग्णांची संख्यादेखील सलग दुसऱ्या दिवशी बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा जास्त असल्याचं समोर आलं आहे.

काय आहे आकडेवारी?

राज्यात कोरोनामुळे गुरुवारी नव्या 231 रुग्णांचं निदान झालं आहे. तर 221 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सध्याच्या घडीला राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या ही 2 हजार 278 इतकी असल्याची नोंद करण्यात आली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट हा 96.80 टक्के इतका असून पॉझिटिव्हिटी रेट घटला आहे. गुरुवारी एकूण 4 हजार 372 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर आतापर्यंतची एकूण बाधितांची संख्या ही 1 लाख 66 हजार 920 इतकी झाली आहे. यापैकी 1 लाख 61 हजार 582 रुग्ण कोरोनातून बरे झाल्याचीही आकडेवारी आरोग्य खात्यान दिलेल्या आकडेवारीतून देण्यात आली आहे.

जून महिन्यात 400हून अधिक बळी

जुलै महिन्याच्या पहिला दिवशी मृतांचा आकडा एक अंकी जरी असला तरी जून महिन्यात राज्यात एकूण ४०५ जणांचा कोरोनाने बळी घेतला. ११,०२३ रुग्ण आढळले, तर महिन्याभरात २१,१०७ जणांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मातही केली. बाधित होण्याच्या दरात १४.३ टक्क्यांची घट होऊन हा दर ५.७ टक्के झाला आहे. दरम्यान, मंगळवार आणि बुधवारच्या चोवीस तासांत नवे २४० रुग्ण सापडले असून, आणखी सहा जणांचा मृत्यूही झाला आहे.

हेही वाचा : ‘डॉक्टर डे’च्या दिवशीच डॉक्टर दांपत्याची आत्महत्या

३१ मे २०२१ रोजी राज्यात २,६४९ कोविडबळी होते. महिन्याभरात त्यात ४०५ जणांची भर पडल्याने गुरुवारी एकूण बळींचा आकडा ३,०60 झालाय. जून महिन्यात नव्या रुग्णांची संख्या ११,०२३ ने वाढल्यामुळे आतापर्यंत सापडलेल्या एकूण रुग्णांची संख्या १,६६,६८९ झाली आहे. तर महिन्यात तब्बल २१,१०७ जण करोनामुक्त झाल्याने एकूण करोनामुक्त झालेल्यांची संख्या १,६१,३६१ झाली आहे. ३१ मे रोजी राज्यात १२,७६३ सक्रिय बाधित होते. महिन्याभरात त्यात कमालीची घट होऊन बुधवारी हा आकडा २,२७४ झाला. तर बाधित होण्याचा दर २० टक्क्यांवरून ५.७ टक्क्यांपर्यंत आला आहे.

हेही वाचा : वेळसांव समुद्रात 27 वर्षीय तरुण बुडाला

जून महिन्याचा रिपोर्ट काय सांगतो?

गतवर्षी जूनमध्ये राज्यातील कोविडचा पहिला बळी गेला होता. तेव्हापासून आतापर्यंत महिन्यांतील बळींची आकडेवारी पाहता मे २०२१ हा महिना बाधितांसाठी सर्वाधिक घातक ठरला होता. ३१ मेपर्यंत राज्यात एकूण २,६४९ जणांचे बळी गेले होते. त्यात मे २०२१ या केवळ एका महिन्यात सर्वाधिक म्हणजे १,४८१ बाधितांचे प्राण गेले होते. यावरून या महिन्यात दिवसाकाठी सरासरी ४७ कोरोनाबाधितांचा बळी गेल्याचे स्पष्ट झाले होते.

राज्यातील करोनाबाधित आणि मृत पावणाऱ्यांच्या संख्येत घसरण होत असल्याने गोमंतकीय जनतेला दिलासा मिळालेला असला, तरी दररोजच्या बाधितांत चढ-उतार होत असल्याने काही प्रमाणात चिंताही आहे. पण, गेल्या काही दिवसांपासून आकडेवारीत होत असलेली घट पाहता पुढील काही दिवस गोमंतकीय जनतेने करोनासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वांची काटेकोरपणे अंमलबजावणी केल्यास लवकरच करोनावर पूर्णपणे नियंत्रण आणण्यात यश येईल, असा विश्वास राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा : तिसरी लाट आली तरी, तोंड द्यायला सरकार सक्षम!

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!