बापरे ! निम्मे भारतीय मास्कच वापरत नाहीत

देशातल्या 25 प्रमुख शहरात करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून पुढं आला धक्कादायक अहवाल

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : गेल्या वर्षी मार्च महिन्यात देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्याच्याही ४ महिने आधी जगात पहिला रुग्ण सापडला. भारतात त्यासाठी अजून दोन महिने जावे लागले. पण कोरोनाचं संकट गंभीर झाल्यानंतर केंद्रसरकारने सुरुवातीपासून जे काही नियम, आवाहनं, सूचना, आदेश दिले आहेत, त्या सगळ्यांमध्ये एक बाब सातत्याने सांगितली जात आहे, ती म्हणजे मास्क वापरा, सातत्याने हात धुवा आणि शारिरिक अंतर पाळा! आज देशात असंख्य प्रकारचे मास्क उपलब्ध आहेत. कोरोनाचा राक्षस डोक्यावर नाचत आहे. पण असं असतानाही मास्क या अत्यंत मूलभूत सुरक्षेकडे भारतीयांनी दुर्लक्ष केल्याचंच चित्र आहे. खुद्द केंद्र सरकारनेच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार तब्बल अर्धा भारत मास्कच वापरतच नाही हे स्पष्ट झालं आहे!

देशाच्या कोविडविरोधातल्या लढ्याला साथ द्या !

एप्रिल महिन्यात झालेल्या एका सर्वेक्षणाच्या हवाल्याने केंद्र सरकारने इंडिया फाईट्स करोना या अधिकृत ट्विटर हँडलवर ही आकडेवारी पोस्ट केली आहे. केंद्र सरकारने एका सर्वेक्षण अहवालाच्या हवाल्याने दिलेल्या आकडेवारीनुसार, अर्धा भारत मास्क वापरतच नाही. त्यामुळे पुन्हा एकदा आरोग्य प्रशासनाकडून कोरोनाविरोधात सुरू असलेल्या लढ्यामध्ये मास्क वापरणं आवश्यक आणि महत्त्वाचं असल्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!