डी. पुरंदेश्वरी यांनी घेतलं महालक्ष्मी देवीचं दर्शन

भाजप नेत्यांची उपस्थिती; ताळगाव समाज केंद्र परिसरात केलं वृक्षारोपण

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीस डी. पुरंदेश्वरी यांनी आजच्या राजकीय दौऱ्याला सुरुवात करण्याआधी पणजीच्या श्री महालक्ष्मी देवीचे आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांनी मंदिर संकुलातील इतर देवतांचंही दर्शन घेतलं.

डी. पुरंदेश्वरी या सोमवारपासून राज्याच्या दौऱ्यावर आहेत. काल रात्री त्यांनी थिवी मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आज सकाळी त्यांनी महालक्ष्मी देवीचे आशीर्वाद घेतले. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, संघटन सचिव सतीश धोंड, प्रदेश सरचिटणीस दामोदर नाईक, माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येंकर आदी उपस्थित होते.

यानंतर त्यांनी ताळगाव समाज केंद्र परिसरात वृक्षारोपण केलं. यावेळी महसुलमंत्री जेनिफर मोन्सेरात यांनी त्यांचं स्वागत केलं. प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यावेळी उपस्थित होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!