सीझेडएमपी जनसुनावणी; खंडपीठात याचिका दाखल

गोवा फाऊंडेशनकडून मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: किनारी नियामक क्षेत्र परिसरात किनारी क्षेत्र व्यवस्थापन आराखडा (सीझेडएमपी) तयार करण्यासाठी हल्लीच जनसुनावणी घेण्यात आलीये. याला गोवा फाऊंडेशनने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिलंय.

७ मार्च रोजी ही जनसुनावणी घेण्यात आली

राष्ट्रीय हरित लवादाच्या (एनजीटी) सूचनेनुसार, उत्तर आणि दक्षिण गोव्यात दोन ठिकाणी सीझेडएमपीच्या मसुद्यावर ७ मार्च रोजी ही जनसुनावणी घेण्यात आलीये. ही सुनावणी बेकायदेशीर असल्याचा दावा याचिकेत करण्यात आलाय. खंडपीठाने संबंधित याचिका प्रतिवादींना देण्यास परवानगी दिलीये. दरम्यान, या प्रकरणी एनजीटीकडे याचिका दाखल करण्याबाबत पर्याय पडताळून पाहण्याची सूचना केलीये.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!