वादळाची भीती! गोव्यात एनडीआरएफचं पथकही सज्ज

गोव्यावरही वादळाचा परिणाम जाणवणार?

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

ब्युरो : गोवा राज्याला तौक्ते वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. दरम्यान या वादळाच्या पार्श्वभूमीवर आज उद्या मूसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहेय. दरम्यान, शुक्रवारी गोव्याच्या बहुतांश भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालाय. विजांच्या गडगडाटात झालेल्या या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडवली.

कुठे धडकणार वादळ?

अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्याचे रूपांतर तौक्ते चक्री वादळात झाल्याचं सांगितलं जातंय. लक्षद्विप मध्ये निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा ईशान्येकडे सरकत आहे. 12 तासांत या पट्ट्याचं चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यताय. 18 मे पर्यंत हे वादळ गुजरात मध्ये धडकेल, अशी भीती व्यक्त केली जाते आहे.

दरम्यान, चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे समुद्रात वारे तशी 70 ते 80 किलोमीटर आणि प्रसंगी 90 ते 100 किलोमीटर वेगाने वाहतील तर किनाऱ्यावर वाऱ्याचा वेग 40 ते 50 किलोमीटर असेल, असंही सांगण्यात आलंय. दरम्यान, वादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्रही खवळेला असणार आहे.

NDRFचं पथकही सज्ज

मडगाव, कुडचेडे, केपे, सांगे येथे पावसाने दमदार हजेरी लावली आहे. उत्तर गोव्यातील बहुतांश किनारी पट्ट्यासह म्हापसा आणि डिचोलीतही पाऊस झालाय. ‘तौत्के’ चक्रीवादळच्या पार्श्वभूमीवर कोकण किनारपट्टीवर हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. आज आणि उद्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर या दोन जिल्ह्यात ऑरेंज झोन जारी करण्यात आला आहे. दरम्यान, संभाव्य वादळाचा धोका लक्षात घेता गोव्यात NDRFची टीमही तैनात करण्यात आली आहे.

व्हिडीओ –

पणजीत झालेल्या पावसाची दृश्यं

खोर्ली म्हापसा इथं नारळाच्या झाडावर वीज कोसळली

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!