ऐकावं ते नवलच! चक्क पोलिसाच्या नावे फेसबूक अकाऊंट काढून मागितले पैसे

गोव्याच्या एका पोलिस अधिक्षकांचं फेसबूक अकाऊंट हॅक

Goan Varta Live | प्रतिनिधी

वास्को : गोवा पोलिस दलातील एका आयपीएस अधिकाऱ्याच्या नावे फेसबूक अकाऊंट सुरु करण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर तातडीनं तक्रार दाखल करण्यात आली आणि त्यानंतर हे फेसबूक अकाऊंट सायबर क्राईमकडून बंद करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. सायबर क्राईमचे पोलिस निरीक्षक विश्वेश कर्पे यांनी तात्कार कारवाई करत हे अकाऊंट बंद केलंय.

गोव्यातील एका एसपीच्या नावे एकाने फेक फेसबूक अकाऊंट सुरु केलं. या अकाऊंटवरुन अनेकांना फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठवण्यात आल्या होत्या. त्यानंतर फेसबूक मेसेंजरवरुन या फेस अकाऊंटवर पैशांची मागणी केली गेल्यानं अनेकांशी शंका उपस्थित केली. ही बाब लक्षात आल्यानंतर संबंधित एसपीनं तात्काळ रीतसर तक्रार दाखल केली. सायबर क्राईम विभागानं तातडीनं खबरदारीची पावलं उचलत हे फेक अकाऊंट बंद केल्याची माहिती मिळतेय. सध्या पोलिसांकडून हे फेक अकाऊंट तयार करणाऱ्याचा शोध सुरु आहे. लवकरच हे फेक अकाऊंट तयार करणाऱ्याच्या मुसक्या आवळ्यात येतील, असा विश्वास व्यक्त केला जातोय.

गोवनवार्ता लाईव्हच्या प्रतिनिधींनाही फ्रेन्ड रिक्वेस्ट

गोवनवार्ता लाईव्हचे प्रतिनिधी श्याम सूर्या नाईक यांनाही या फेक अकाऊंटवरुन फ्रेन्ड रिक्वेस्ट आली होती. ही रिक्वेस्ट एक्सेप्ट केल्यानंतर त्यांना मेसेजरवर फेक अकाऊंटवरुन विचारणा करण्यात आली. यावेळी मोबाईल नंबर मागण्यात आल्यानंतर नाईक यांना शंका आली. त्यानंतर त्यांनी एसपींकडे संपर्क केला असता, या फेक अकाऊंटबाबत अनेक तक्रारी आल्याचं त्यांनी सांगितलंय.

फेक अकाऊंटपासून सावधान

गेल्या काही दिवसांत अनेकांचे फेसबूक अकाऊंट हॅक होत आहेत. तर अनेकांच्या नावे फेक अकाऊंट तयार करुन पैशांची मागणी केली जात आहेत. त्यामुळे जर तुम्हाला अशाप्रकारे फेसबूकवरुन ओळखीच्या किंवा अनोळखी माणसाकडून पैशांबाबत विचारणा झाली, तर सतर्क राहा. व्यक्तिशः फोन करुन किंवा संपर्क करुन पडताळणी करुन घ्या. फसव्या आश्वासनांना बळी न पडता काळजी घेण्याचं आश्वासन गोवा पोलिसांच्या सायबर क्राईम विभागानं केलं आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!