वायफायची केबल कापल्यावरुन आमदार सोपटे, आरोलकरांमध्ये शीतयुद्ध

अज्ञातांनी कापली केबल; मगो पक्षाकडून प्रकाराचा निषेध; आमदार सोपटेंवरही केली टीका

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणेः मांद्रे पंचायत क्षेत्रातील गरजवंत विद्यार्थ्यांसाठी १९ रोजी मगोपचे नेते जीत आरोलकर यांनी 24 तास मोफत वायफाय सेवा सुरू केली होती. या सेवेचा पुरवठा करणारी केबल अज्ञातांनी कापून टाकली आहे. या प्रकाराचा मगोपच्या स्थानिक नेत्यांनी निषेध केला असून आमदार दयानंद सोपटे यांच्यावर टीका केली आहे.

हा प्रकार कदापि सहन करणार नाही

हा प्रकार मगोप कादापि सहन करणार नाही, असा इशारा पक्षाच्या केंद्रीय समितीचे सदस्य आणि मांद्रेचे माजी सरपंच, विद्यमान पंच राघोबा गावडे यांनी स्थानिक पत्रकारांशी बोलताना दिला.

हेही वाचाः नारायण नाईक हल्ला प्रकरणः फरार संशयित फकिरची पोलिसांसमोर शरणागती; पोलिसांनी केली अटक

मांद्रेत कापली केबल

आरोलकरांनी मांद्रे पंचायत सभागृहात खास विद्यार्थ्यांसाठी २४ तास विनामूल्य वायफाय सेवा सुरु केली आहे. लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे २० रोजी आमदार दयानंद सोपटे यांनी पार्से पंचायत क्षेत्रातील गरजू विद्यार्थ्यांसाठी पंचायतीच्या सभागृहात प्रतिदिन दोन तास मोफत वायफाय सेवेचा शुभारंभ केला. दरम्यान, मांद्रेतील स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या पुतळ्याजवळ अज्ञातांनी केबल कापल्याने येथील इंटरनेट सेवेत व्यत्यय आला.

हा व्हिडिओ पहाः MOBILE NETWORK| मंत्री दिपक प्रभु पाऊसकर, सत्तरीच्या उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदने

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!