दाबोळीत कस्टम अधिकाऱ्यांची धडक कारवाई

३.३७ लाखांचे सोने जप्त; १७ दिवसांतली तिसरी कारवाई; सोन्याची तस्करी करणाऱ्या प्रवाशाला पकडलं रंगेहाथ

Goan Varta Live | प्रतिनिधी

वास्कोः दुबईहून दाबोळी विमानतळावर सोमवारी उतरलेल्या इंडिगो (६ ई-८४४५) विमानातील एका प्रवाशाकडून कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी ३ लाख ३७ हजार ५९० रुपयांचं तस्करीचं सोनं जप्त केलंय. त्या प्रवाशाने सोन्याचे कॅप्सूल बनवून गुप्तांगात लपवून आणले होते. मात्र तस्करीचं सोनं येणार असल्याची खबर अधिकाऱ्यांना असल्याने त्याचा बेत फसला.

१७ दिवसांतली तिसरी कारवाई

गेल्या १७ दिवसांत दाबोळी विमानतळावरील कस्टम अधिकाऱ्यांनी तस्करीच्या सोन्याबाबत केलेली ही तिसरी कारवाई आहे. या तिन्ही कारवायांत मिळून एकूण ५ लाख ७७ हजार २८७ रुपयांचं तस्करीचं सोनं जप्त करण्यात आलंय.

दुबईहून आलेल्या प्रवाशाला अटक

एक प्रवासी विदेशातून तस्करीचं सोनं घेऊन येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर कस्टम विभागाचे साहाय्यक आयुक्त वाय. बी. राहारे यांच्या मार्गदर्शनाखाली विदेशातून येणाऱ्या प्रवाशांवर कडक नजर ठेवण्यात आलीये. दुबईहून आलेल्या एका प्रवाशाचा संशय आल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली. हा प्रवासी मूळ कासरकोड, केरळ येथील आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!