जिज्ञासा ग्रुप पोहोचला महाअंतिम फेरीत, ‘या’ तरुणांचा रंजक प्रवास वाचा सविस्तर…

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'मी होणार सुपरस्टार'

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : काही महाविद्यालयातील मित्र. काहीजण मित्रांचे मित्र. घुमट आरतीच्या समूहात आरती म्हणत गाण्यांची आवड. त्यातूनच विविध वाद्ये आणि संगीताची रुची निर्माण झालेली. असे हे गायन व वादनाच्या आवडीने एकत्र आलेले तरुण. सुरुवातीला संगीतात काही वेगळे प्रयोग करत सोशल मीडियावर व्हिडीओ टाकण्यास सुरुवात केली. त्यामुळे आपल्या मित्रवर्गात एक प्रेक्षक वर्ग त्यांनी तयार केला होता. त्यातूनच कुणीतरी स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मी होणार सुपरस्टार’ या कार्यक्रमाच्या ऑडिशनची जाहिरात पाठवली. सहज म्हणून व्हिडीओ पाठवला आणि तो निवडला गेला. एक-एक टप्पा पार करत या शोच्या यावर्षीच्या पर्वात या सहा मित्रांची निवड निश्चित झाली.
हेही वाचा:Crime | गोव्यातील ड्रग्सचे धागेदोरे हैदराबादपर्यंत!

तरुणांचा जिज्ञासा समूह महाअंतिम फेरीत

गेले काही दिवस आपल्या सादरीकरणाने गोव्यासह महाराष्ट्रातील तमाम रसिकांचे प्रेम मिळवलेल्या या तरुणांचा जिज्ञासा हा समूह या शोच्या महाअंतिम फेरीत पोहोचला आहे. त्यानिमित्त त्यांनी ‘गोवन वार्ता’ शी खास संवाद साधला. सनिल पार्सेकर, वरद भट, आकाश गावकर, दत्तराज च्यारी, दत्तराज कोलवाळकर व यशवंत नाईक या गोव्याच्या तरुणांनी महाराष्ट्र आणि गोव्यातील संगीत रसिकांना अक्षरशः वेड लावले आहे. जुन्या नव्या संगीताचा मेळ घालत प्रेक्षकांसमोर सादर केलेल्या गाण्यांनी त्यांनी केवळ मार्गदर्शक व परीक्षक यांचेच नाही तर सहस्पर्धकांच्याही मनात वेगळी जागा निर्माण केली आहे. आपल्या खास कोकणी शैलीत मराठी संवाद साधत केवळ स्पर्धेपुरते नाही तर त्याही पलीकडे जाऊन सर्वांचे प्रेम मिळवले आहे. म्हणूनच तर रियाज, सराव व शूटिंग व्यतिरिक्त इतर वेळतेही इतर सर्व स्पर्धक आपल्या गोमंतकीय तरुणांच्याच सानिध्यात राहणे पसंत करत आहेत. बेला शेंडे, आदर्श शिंदे, सलील कुलकर्णी या मान्यवरांनी सर्वांचे इतके तोंडभरून कोडकौतुक केले आहे.
हेही वाचा:फातोर्डातील एका वेटरचा मृत्यू, ‘हे’ आहे कारण…

पुष्करने या चमूला आवर्जून बोलावले भेटायला

कार्यक्रमाचा सूत्रसंचालक पुष्कर श्रोत्री याचेही खूप जवळचे नाते निर्माण झाले आहे. गोव्यात झालेल्या मराठी चित्रपट महोत्सवाला आलेल्या पुष्करने या चमूला आवर्जून भेटायला बोलावले होते. रविवारी होणाऱ्या महाअंतिम फेरीत निकाल काहीही लागला तरी या शोमुळे मिळालेल्या गोष्टी आयुष्यभर पुरणार आहेत. कधी वाटले नव्हते इतकी प्रसिद्धी आणि प्रेम मिळाले. भाषेच्या मर्यादा सर करून कोणत्याही क्षेत्रात, कोणत्याही प्रांतात आपले अस्तित्व सिद्ध करता येऊ शकते याची प्रेरणा मिळाली. म्हणूनच आमच्या या ग्रुपच्या माध्यमातून भविष्यातही आमचे हे काम चालू ठेवणार आहोत. सोशल मीडियासाठी आणखी नवनवे व भन्नाट व्हिडीओ करणार आहोत. असे ते यावेळी म्हणाले. या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या राज्यातील प्रत्येक कलाकारासाठी हे तरुण आदर्श बनले आहेत.
हेही वाचा:चिखलीत अमली पदार्थ तस्करी प्रकरणी एकाला अटक…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!