CURFEW | कर्फ्यू 21 जूनपर्यंत वाढवला

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली घोषणा

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो: कर्फ्यू संपला म्हणेस्तोवर शनिवारी रात्री मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांनी राज्यव्यापी कर्फ्यूमध्ये वाढ करत असल्याची घोषणा केली आहे. त्यासोबत अत्यावश्यक सेवेतील दुकानांना सांगितलेल्या वेळेतच खुले राहण्याची परवानगी असल्याचं स्पष्ट केलं आहे.

हेही वाचाः चकीत करणारी बातमी : लॉकडाऊन काळात पतिराजांचा होतोय छळ !

कर्फ्यू 21 जूनपर्यंत वाढला

मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत कर्फ्यू वाढवत असल्याचं स्पष्ट केलं आहे. राज्यातील कर्फ्यू सात दिवसांनी वाढवला असून आता 21 जून पर्यंत राज्यात कर्फ्यू लागू असणार आहे. 21 जून रोजी सकाळी सात पर्यंत कर्फ्यू लागू असणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी दिली आहे.

अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते दुपारी 3

दरम्यान, कर्फ्यू वाढवण्यासोबतच मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी अत्यावश्यक सेवेतील दुकानांना सांगितलेल्या वेळेतच सेवा देण्याची मुभा दिलीये. अत्यावश्यक सेवेतील दुकानं उघडी ठेवण्याची वेळ 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. त्यात कोणतेही बदल करणार नसल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत.

हेही वाचाः CORONA UPDATE | देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट

आजपासून 18 ते 44 वयोगातील व्यक्तींचं लसीकरण

दरम्यान, मान्सूनच्या पार्श्वभूमीवर काही दिलासेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील जनतेला दिले आहेत. कडधान्यांसोबत घर बांधकाम साहित्य, पावसाळी साहित्य आणि स्टेशनरीची दुकानं ही देखील या वेळेत सुरु राहतील असं मुख्यमंत्र्यांनी मागेच स्पष्ट केलं होतं. कोरोना रुग्णवाढ आटोक्यात आलेली असतानाच कोरोनाचं लसीकरण करण्यावर सरकार भर देतंय. दरम्यान, रुग्णवाढ घटली असली तरी शनिवारी राज्यात 15 जणांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी काळजी करायला लावणारी आहे. तसंच आजपासून 18 ते 44 वयोगतील लसीकरणाला सुरुवात करत असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केलीये.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!