CURFEW | कर्फ्यू वाढीचं सत्र कायम; अजून 7 दिवसांनी कर्फ्यू वाढवला

12 जुलै पर्यंत राज्यव्यापी कर्फ्यू वाढला; मुख्यमंत्र्यांनी ट्विट करत केली घोषणा

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : राज्यव्यापी कर्फ्यूमध्ये आणखी ७ दिवस वाढ केल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली आहे. सोशल मीडियामध्ये पोस्ट करत त्यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे. लवकरच याबाबतचा अधिकृत आदेशही जिल्हाधिकाऱ्यांकडून जारी केला जाणार आहे.

हेही वाचाः प्रेयसीला वैतागून माथेफिरुने तिच्या कुटुंबालाच संपवलं! शेतात पुरलेले मृतदेह हाती

ट्विट करत केली घोषणा

मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत कर्फ्यू वाढवत असल्याचं स्पष्ट केलं आहे. राज्यातील कर्फ्यू सात दिवसांनी वाढवला असून आता 12 जुलै पर्यंत राज्यात कर्फ्यू लागू असणार आहे. 12 जुलै रोजी सकाळी सात पर्यंत कर्फ्यू लागू असणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी दिली आहे.

सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत दुकाने खुली

राज्यव्यापी कर्फ्यू जरी 7 दिवासांनी वाढवला असला तरी दुकानांच्या कामकाजाच्या वेळा वाढवण्यात आल्या आहेत. नवीन नियमांनुसार आता सकाळी 7 ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत दुकाने खुली ठेवायला राज्य सरकारने मुभा दिली आहे. त्याचप्रमाणे सलून, आऊटडोअर स्पोर्टस कॉम्प्लेक्स, स्टेडियमही यांनादेखील सेवा पुरवण्याची परवानगी राज्य सरकारकडून देण्यात आली आहे.

हेही वाचाः ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह हिंदुजा रुग्णालयात ऍडमिट

राज्यातील कोरोना रुग्णवाढीला ब्रेक

राज्यातील रुग्ण हळूहळू आटोक्यात येत आहे. मृत्यू होण्याचं प्रमाण कमी झालंय. मात्र ते शून्यावर आलेलं नाही. त्यामुळे राज्यातील कोरोनाची लाट जरी ओसरत असल्याचा दावा केला जात असला तरीही चिंता कायम आहे. अशातच कोरोना लसीकरण मोहीम जोरात सुरू आहे. राज्यातील १०० टक्के लसीकरणाचं लक्ष्य गाठण्यासाठी वेगानं लसीकरण मोहीम राबवली जाते आहे. कोरोना लसीच्या पहिल्या डोसचं १०० टक्के लसीकरण जुलै महिन्याच्या अखेरीस पूर्ण करण्याचं ध्येय सरकारनं ठेवलं आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!