कर्फ्यू पुन्हा वाढवला! 30 ऑगस्टपर्यंत निर्बंध कायम

उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश जारी

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : राज्यव्यापी कर्फ्यूमध्ये वाढ करण्याचं सत्र कायमच आहे. आता पुन्हा एकदा 7 दिवसांनी राज्यव्यापी कर्फ्यू वाढवण्यात आला आहे. 30 ऑगस्टपर्यंत राज्यात कर्फ्यू लागू असणार आहे. सकाळी 7 वाजेपर्यंत राज्यव्यापी कर्फ्यूचे निर्बंध लागू करण्याबाबतचा आदेश उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांकडून जारी करण्यात आला आहे.

केरळमधून येत असाल तर..

दरम्यान, राज्यात येण्यासाठी कोरोना चाचणी बंधनकारक जरी ठेवली असली, तरीही केरळमधून येणाऱ्यांबाबत अधिक खबरदारी घेण्यात येत आहे. गेल्या वेळेप्रमाणेच यंदाही केरळमधून जरा गोव्यात यायचं असेल, तर RT-PCR चाचणी करुनच गोव्यात प्रवेश मिळू शकेल. 72 तास आधीचा RT-PCR चाचणीच्या निगेटिव्ह रिपोर्टनंतरच केरळमधून येणाऱ्यांना गोव्यात प्रवेश दिला जाणार आहे.

त्याचप्रमाणे कोविड लसीचे दोन्ही डोस जर झाले असतील आणि 14 दिवसांचा कालावधी होऊन गेला असेल तर अशांना गोव्यात प्रवेश दिला जाईल, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. नोकरी, धंद्यानिमित्त गोव्यात सातत्यानं ये-जा करणाऱ्यांना ही महत्त्वपूर्ण सूट देण्यात आली आहे.

बंद काय काय?

कॅसिनो बंद राहणार असून ऑडिटोरीयम, कम्युनिटी हॉल, रिव्हर क्रूझ, वॉटर पार्क, शाळा हे सगळं बंदच राहणार आहे. दुसरीकडे हॉटेल्स बार रेस्टॉरंट सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेनं सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. व्यायामशाळाही 50 टक्के क्षमतेनं सुरु राहतील. तर दुसरीकडे स्पा आणि मसाज पार्लर मात्र बंदच ठेवण्याचे आदेश कायम आहेत.

ही शेवटची कर्फ्यूवाढ ठरणार?

दरम्यान, राज्यातील लसीकरणानं महत्त्वाचा टप्पाही गाठलाय. लसीकरण शंभर टक्के झालं नसलं, तरीही सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून महाविद्यालयं सुरु करण्याबाबतचे प्रयत्न सुरु असल्याचं कळतंय. त्या पार्श्वभूमीवर येत्या काळात शाळाही सप्टेंबरपासून सुरु केल्या जाणार का, याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलंय. त्यामुळे यावेळी केलेली कर्फ्यूवाढ ही शेवटची ठरते का, हे पाहणंही औत्सुक्याचं आहे.

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!