कुंकळ्ळीचं राजकारण गलिच्छ पातळीवर

‘सिटीझन्स फॉर डेमोक्रसी’ सामाजिक गटाचे नेते एल्विस गोम्स यांची टीका

Goan Varta Live | प्रतिनिधी

कुंकळ्ळीः गोवा, खासकरुन कुंकळ्ळीमधील राजकीय प्रवृत्तीने गलिच्छ पातळी गाठली आहे, अशी टीका माजी नोकरशहा आणि ‘सिटीझन्स फॉर डेमोक्रसी’ या सामाजिक गटाचे नेते एल्विस गोम्स यांनी केली. गुढी पारोडा येथे माजी सरपंच गॅब्रिएल फर्नांडिस यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना गोम्स बोलत होते. राजकीय प्रतिस्पर्ध्यांशी निष्ठा असल्यामुळे लोकांमधील शत्रुत्व बिघडत चाललंय. शांततेत राहणाऱ्या, सामान्य लोकांना राजकारण्यांची शत्रू बनवण्याची प्रवृत्ती वाढत चाललीये आणि कुंकळ्ळी मतदारसंघही त्याला अपवाद नाही, असं गोम्स म्हणालेत.

हेही वाचाः मराठी सण परंपरेत काय आहे वटपौर्णिमेचं महत्व…

पोलीस कायद्यानुसार चालले असते तर अशी परिस्थिती उद्भवली नसती

मी या घटनेकडे एक साधा कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा म्हणून पाहत आहे. पोलिसांनी कायद्यानुसार आणि टीसीपी विभागाने योग्य ते केलं असतं, तर ही परिस्थिती उद्भवली नसती. अशा प्रकारच्या निष्क्रियतेमुळे लोकांचा त्यांचा जीव संकटात घालण्याची किंवा गमावण्याची वेळ आली आहे, असं गोम्सनी खेदपूर्वक म्हटलं.

हेही वाचाः मोरपीर्ला पंचायत क्षेत्रात लसीकरण मोहीम

यापूर्वी असं कधीच घडलं नव्हतं

यापूर्वी कुंकळ्ळीमध्ये रॉक सांतान फर्नांडिस, मारिओ वाझ, फर्दिन रिबेलो, मानु फर्नांडिस, अरेसिबो आदी आमदार होते, ज्यांनी लोकांना कधीच एकमेकांविरूद्ध उभं केलं नाही आणि सध्याचं राजकारण त्या काळच्या पातळीरुन एकदम खाली आलंय, असा आरोपही गोम्सनी केलाय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!