‘सेसा’च्या ४४३ कामगारांवर संकट…

५ ऑक्टोबरपासून वगळण्याची शक्यता : संघटनेच्या वार्षिक सभेमध्ये मुद्दा गाजला

Goan Varta Live | प्रतिनिधी

वाळपई : सेसा गोवा खाण कंपनीच्या एकूण ४४३ कामगारांना ५ ऑक्टोबरपासून घरी पाठविण्यात येणार आहे. यामुळे कामगारांमध्ये खळबळ निर्माण झालेली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी खाण व्यवसाय तीन महिन्यांमध्ये सुरू होणार असल्याची घोषणा केलेली आहे. यामुळे कंपनीने या कामगारांना कमी करू नये. मुख्यमंत्री प्रमोद सावंत व इतर आमदारांनी लक्ष घालून कामगारांना सहकार्य करावे, अशी मागणी सेसा गोवा कामगार संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतून करण्यात आली आहे.
हेही वाचाःड्रग्ज प्रकरणी सांतिनेज, मेरशीत छापा, दोघांना अटक…

कामगार कुटुंबांना सुरक्षा प्रदान करावी, अशी मागणी

संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा साखळी येथील रवींद्र भवनामध्ये झाली. सभेला मोठ्या प्रमाणात कामगार बांधवांची उपस्थिती होती. वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ५ ऑक्टोबरपासून कामगारांना वगळण्यात येण्याचा मुद्दा प्रामुख्याने गाजला. सरकारने कंपनीवर दबाव आणावा व या कामगार कुटुंबांना सुरक्षा प्रदान करावी, अशी मागणी केली. याप्रसंगी व्यासपीठावर सेसा गोवा कामगार संघटनेचे अध्यक्ष देवानंद परब, सचिव रमेश सिनारी, कामगार संघटनेचे पदाधिकारी अनंत गांवस, अमेय नाईक, विशाल नाईक, सत्यजित चौरसकर, लॉरेन्स ब्रागांझा, प्रसाद गावस, प्रेमानंद सावंत यांची उपस्थिती होती.
हेही वाचाःमुले पळविल्याच्या अफवांवरुन संशयिताला मारहाण…

कामगारांच्या कुटुंबासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित

संघटनेचे अध्यक्ष देवानंद परब यांनी सांगितले की, ५ ऑक्टोबरपासून कंपनीच्या ४९८ जणांना कमी करण्यात येणार आहे. या संदर्भाची नोटीस कंपनीने यापूर्वी दिलेली आहे. यामुळे या कामगार बांधवांच्या कुटुंबासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित राहणार आहे. या संदर्भात अनेकवेळा निवेदन सादर करण्यात आलेली आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व राज्यातील इतर आमदारांनी या कामगारांबाबत गांभीर्याने विचार करावा.
हेही वाचाःचोरट्यांनी बंद घर फोडून १४.८५ लाखांचे दागिने केले लंपास…

येणाऱ्या काळात खाणीचा व्यवसाय पुन्हा होणार सुरू

खाणीचे काम बंद असतानाही कंपनीने आम्हाला चांगल्या प्रकारचे सहकार्य केलेले आहे. यामुळे येणाऱ्या काळात खाणीचा व्यवसाय पुन्हा सुरू होणार असल्यामुळे कंपनीने या कुटुंबाच्या कामगार बांधवांचा विचार करावा, अशी मागणी करण्यात आली. निरज गावस यांनी कंपनीच्या व्यवस्थापनाबरोबर चर्चा करून हा निर्णय सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. प्रसाद गावस यांनी सांगितले की, शेवटच्या क्षणापर्यंत कामगार बांधवांच्या हक्कासाठी लढा देण्यात येणार आहे. सर्व बांधवांनी कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नये, असे स्पष्ट केले. संघटनेचे पदाधिकारी सूरज गावस यांनी सभेचे सूत्रसंचालन केले.
हेही वाचाःराज्यातील आठ गायींना लंपी रोगाची झाली लागण…

कॉन्ट्रॅक्टरच्या जागी आम्हाला सामावून घ्यावे.

रमेश सिनारी यांनी सांगितले की, कंपनीने अनेक ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरची नियुक्ती केलेली आहे. अजूनही सदर ठिकाणी कामगारांची गरज आहे. यामुळे कंपनीने या कामगारांना सदर ठिकाणी सामावून घ्यावे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत कामगारांना वगळू नये, अशी विनंती केली. कंपनीचे अनेक राज्यांमध्ये व्यवहार सुरू आहेत. सदर ठिकाणी जाण्यासाठी सुद्धा अनेक कामगार आजही तयार आहेत. मात्र, कंपनीने या संदर्भात व्यवस्था करावी. 
हेही वाचाःPFI Banned : ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ आणि संलग्न संघटनांच्या मुसक्या आवळल्या…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!