Crime Update| नागवा-हडफडे येथे युवकावर खुनी हल्ला प्रकरणी तिघांना अटक…

शनिवारी पहाटे ३च्या सुमारास घडली होती घटना

Goan Varta Live | प्रतिनिधी

म्हापसा : एका युवकाला मारहाण करत सुरा हल्ला करून त्यास जखमी केल्याची घटना नागवा येथे घडली आहे. हल्ला झालेल्या युवकाचे नाव रवी शिरोडकर (३०, रा. कळंगुट) असे आहे. जखमी युवकाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी चार संशयितांना अटक केली आहे.
हेही वाचाःसरकारचा गोमंतकीयांना झटका; पाणी बिलात ‘वाढ’…

संशयितांचा गट दारू पिण्यासाठी नेहमीच्या ठिकाणी बसला

पोलिसांनी या प्रकरणी प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा नोंदविला आहे. ही घटना शनिवारी पहाटे ३ च्या सुमारास नागवा येथे घडली. घटनास्थळी संशयित टार्झन पार्सेकर यांचा गट दारू पिण्यासाठी नेहमीच्या ठिकाणी बसला होता. तर जखमी रवी शिरोडकर हा त्यांच्यामध्ये सहभागी झाला होता. पार्टीमध्ये रवीला सहभागी होऊन काही मिनिटेच झाली होती. त्यावेळी संशयित टार्झन पार्सेकर याने त्याच्याशी वाद घातला व मारहाण करण्यास सुरूवात केली.
हेही वाचाःPhoto Story | Navratri Special Day – 6 | राखाडी रंग आयुष्यात योग्य दिशा दाखवतो आणि जीवनातील अंधार दूर करतो…

चाकू जखमी शिरोडकरच्या पोटात खुपसला

दोघांमध्येही हाणामारी झाली. यावेळी संशयिताच्या इतर तिघा साथीदारांनीही जखमीला मारहाण केली. तसेच संशयिताने आपल्याकडील चाकू जखमी शिरोडकर याच्या पोटात खुपसला. यात तो जखमी झाला. त्याला तेथेच टाकून संशयित पसार झाले. इतरांनी जखमीला रुग्णवाहिकेतून थेट गोमेकॉमध्ये उपचारार्थ दाखल केले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
हेही वाचाःPhoto Story | नवरात्रोत्सवातील अनोखं देवदर्शन…

तिघा संशयितांना अटक

युवकावर खुनीहल्ला करण्याची घटना शनिवारी पहाटे 3 च्या सुमारास नागवा येथे घडली. दरम्यान या प्रकरणात हणजूण पोलिसांनी टार्झन पार्सेकर (30, नागवा) या संशयितास शनिवारी अटक केली होती. रविवारी सकाळी पोलिसांनी शैलेश नाईक (20, कामूर्ली), सिध्दांत मांद्रेकर (22, साळगांव) व अमन शिरोडकर (21, साळगाव) या तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.
हेही वाचाःTransfers | पुन्हा ‘या’ १३ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या…

युवक पोलिसांना घाबरुन पळाला

हणजूण पोलिसांनी या प्रकरणी सकाळीच संशयितास पकडून ताब्यात घेतले व त्याची चौकशी केली. त्यानंतर रात्री या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला व संशयित टार्झन पार्सेकर यास अटक केली. इतर तिघा संशयितांचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान, पोलिसांनी टार्झन यास ताब्यात घेतल्याची माहिती मिळताच त्याचे काही मित्र पोलीस स्थानकात दाखल झाले. या सर्वांनाच पोलिसांनी दम दिला. त्या बरोबर एकाने आपल्याला पोलीस अटक करतील म्हणून पोलीस स्थानकातून पळ ठोकली. त्यास नंतर पोलिसांनी काही अंतरावर पाठलाग करून पकडले. चौकशीवेळी सदर युवकाचा या प्रकरणाशी काहीच संबध नाही. तसेच तो पोलिसांना घाबरुन पळाल्याचे स्पष्ट झाले.
हेही वाचाःJio 5G | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली जिओ पॅव्हेलियनला भेट…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!