CRIME UPDATE | अमर नाईक हत्याकांडामागील मुख्य सूत्रधारासाही लवकरच अटक होणार

पोलिसांची माहिती; आरोपी परदेशी असल्यानं त्याला गोव्यात आणण्यासाठी पोलिसांचे सेंट्रल एजेन्सीसोबत प्रयत्न सुरु

श्याम सूर्या नाईक | प्रतिनिधी

ब्युरो: अमर नाईक हत्याकांडाचं षडयंत्र रचणाऱ्याला लवकरच बेड्या ठोकल्या जाणार आहेत. मुख्य संशयित आरोपीचं पासपोर्ट डिटेल्स मिळाले असून कलम ‘१२० ब’च्या आधारे लवकरच मुख्य आरोपीला गोव्यात आणण्यासाठी पोलिसांचे सेंट्रल एजेन्सीसोबत प्रयत्न सुरु केलेत! अमर नाईकच्या प्रेयसीच्या भावानं अमर नाईकच्या हत्येची सुपारी दिली होती. बहिणीशी असलेल्या प्रेमसंबंधांना विरोधातून अमर नाईकचा खून करण्यात आला होता.

अमर नाईक हत्याकांड झाल्यानंतर लगेचच ज्यांननी अमरवर गोळ्या झाडल्या, त्या दोघांना अटक केली होती. त्यानंतर तातडीनं मुख्य संशयित आरोपीलाही बेड्या ठोकण्यात आल्या. दरम्यान, मंगळवारी पत्रकारांशी बातचीत करताना या संपूर्ण घटनेबाबतची माहिती पोलिसांनी समोर आणली आहे.

अमर नाईकच्या प्रेयसीच्या भावानं हे हत्याकांड घडवून आणलंय. प्रेयसीच्या भावानं या नात्याला विरोध असल्यानं त्यानं अमर नाईकच्या हत्येचं षडयंत्र रचलं. आपला जुना मित्र रवीशंकर यादवला पाच लाखांची सुपारी देऊन अमर नाईकची हत्या करण्यास सांगितल्याचं तपासातून उघड झालंय.

हेही वाचाः प्राचार्य डॉ. भूषण भावेंनी घेतली नवनिर्वाचित राज्यपालांची भेट

दरम्यान, रवीशंकर यादवने आपल्या दोघा मित्रांना सोबत घेऊन हे हत्याकांड तडीस नेलं होतं. मात्र दक्षिण गोवा पोलिसांनी हत्येनंतरच्या अवघ्या काही तासांतच मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळल्यात. ज्यानं या हत्येची रवीशंकरला सुपारी दिली होती, तो परदेशात असल्याचं समजलं होतं. त्यामुळे त्या दिशेने चक्र फिरवून पोलिसांनी मुख्य आरोपीला हेरलंय. त्यामुळे मुख्य संशयित आरोपीचं पासपोर्ट डिटेल्स मिळाले असून कलम ‘१२० ब’च्या आधारे लवकरच मुख्य आरोपीला गोव्यात आणण्यासाठी पोलिसांचे सेंट्रल एजेन्सीसोबत प्रयत्न सुरु केलेत!

हेही वाचाः CORONA UPDATE | मंगळवारी पुन्हा 2 कोविडबाधितांचे मृत्यू

काय आहे प्रकरण?

इसोर्शी बोगमळो येथील सागर एन्क्लेव कॉलनीजवळ १५ जुलैला गोळीबाराची घटना घडली. या गोळीबाराप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहेत. युपीतील जौनपूरचा राहणारा २२ वर्षांचा शिवम सिंग आणि गोरखपूरला राहणारा २९ वर्षांचा शैलेश गुप्ता यांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्यात. शैलेश गुप्तांने अमरवर गोळ्या झाडल्या. शैलेश हा क्रेन ऑपरेटर आहे. एका मित्राच्या आमंत्रणावरून ते गोव्यात आले. घटनास्थळाला दोनदा भेट देऊन त्यांनी टेहळणीही केली होती.

शिवम सिंह आणि शैलेशने अमरला घटनास्थळी बोलावलं होतं. अमर नाईक हा आपला मित्र प्रितेश कुट्टीकर याला घेऊन तिथे पोहचला. यावेळी त्यांच्यात काही वेळ चर्चा झाली. नंतर लगेच त्यांनी अमरच्या डोक्यावर पिस्तूल रोखले. गाडीत बसलेला असतानाच त्याच्या डोक्यात गोळ्या झाडल्या. हा प्रकार पाहुन प्रितेश थकबलाच. गोळीबार केल्यानंतर संशयित आरोपी रेंट ए कार केलेल्या स्विफ्टमधून घटनास्थळावरून पळून गेले. प्रितेशने तात्काळ अमरला नजीकच्या चिखली रुग्णालयात नेलं. तिथे अमरला मृत घोषित करण्यात आले. घटनास्थळावरून काही अंतरावर पोलिसांना रेंट ए कार अडगळीत सापडली. या कारमध्ये दोन ओळखपत्र पोलिसांना सापडलीत. विशेष म्हणजे संशयीतांनी मोठ्या चालबाजपणे ही फेक ओळखपत्रे गाडीत टाकली होती जेणेकरून पोलिसांची दिशाभूल करता येईल. मात्र पोलिसांनी मोठ्या शिताफीनं सर्व आरोपींना गजाआड केलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!