CRIME|मडगावात दोन ठिकाणी चोरी, तर मटका प्रकरणी एकाला अटक

दक्षिण गोव्यात गुन्हेगारीची प्रकरणे वाढली

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगावः राज्यात गुन्हेगारीची प्रकरणे वाढली आहेत. दक्षिण गोव्यात या प्रकरणांचा आकडा जास्त आहे. मडगावच्या विविध भागात वेगवेगळ्या चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या शहरातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं पहायला मिळतंय.

हेही वाचाः मुकेश अंबानी तयार करताहेत कोविड 19 प्रतिबंधक लस

घटना 1ः अज्ञातांनी महिलेचा मोबाईल पळवला

दुचाकीवरुन आलेल्या तीन अज्ञातांनी एका २४ वर्षीय महिलेला रस्त्यावर अडवून तिच्या हातातील मोबाईल हिसकावून पळ काढला. नेसाय येथे मंगळवार २४ रोजी ही घटना घडली. मालती बोरान असं तक्रारदार महिलेचं नाव आहे. चोरीला गेलेला मोबाईल सतरा हजार रुपये किमतीचा आहे. भादंसंच्या ३९२ कलमाखाली मायणा कुडतरी पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतलं आहे. उपनिरीक्षक विकेश हडफडकर पुढील तपास करीत आहेत.

घटना 2ः मोबाईल चोरी प्रकरणात दोघांना अटक

मोबाईल चोरी प्रकरणात मडगाव पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. मॅग्नम फर्नांडिस आणि इरफान अहमद अशी संशयितांची नावं आहेत. कालकोंडा येथे संशयितांनी दुचाकीवरुन येऊन अमृतलाल चव्हाण या इसमाचा मोबाईल हिसकावून पळ काढला होता. १९ ऑगस्ट रोजी ही घटना घडली होती. पुढील तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचाः ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी पुण्यातील एका महिलेचं तब्बल 8 लाखांचं नुकसान

घटना 3ः मटका प्रकरणात एकाला अटक

मटका प्रकरणात फातोर्डा पोलिसांनी एकाला अटक केली आहे. फातोर्डा येथे मटका घेताना पोलिसांनी संभाजी राजोईयाला पकडून त्याच्याकडील मटका साहित्य आणि रोख १३०० रुपये जप्त केले. अटक करुन नंतर संशयिताला जामीनावर सोडण्यात आलं.

हेही वाचाः कृषी कार्ड करण्यासाठी जमिनीचा दाखला असणे अनिवार्य नाही

घटना 4ः संशयिताला सशर्त जामीन मंजूर

पैसे द्या अथवा फोटो व्हायरल केल्याची धमकी दिल्याप्रकरणी मडगाव पोलिसांनी अटक केलेल्या संशयित शुभा नाईक हिला न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. संशयिताने तक्रारदाराच्या पत्नीकडे त्या अवस्थेतील फोटो मागितले. तिच्याकडून फोटो घेतल्यानंतर तक्रारदाराकडे पैसे मागितले आणि न दिल्यास ते फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली होती. तक्रारदाराकडून संशयिताने ५ लाख उकळले होते आणि आणखी ३० लाखांची मागणी केली होती. नंतर याप्रकरणी तक्रार नोंद झाल्यानंतर संशयित केरी येथे १० लाख रुपये घेण्यासाठी आली असता, पोलिसांनी तिला अटक केली.

घटना 5ः अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणः सोमवारी बाल न्यायालयात सुनावणी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी रहीम खान याच्या जामिनावर आता सोमवारी ३० ऑगस्ट रोजी बाल न्यायालयात सुनावणी होणार आहे. विवाहाचं आमिष दाखवून एका पंधरा वर्षीय युवतीवर बलात्कार करून जबरदस्तीने गर्भपात केल्याचा संशयितांवर आरोप आहे. दोघा संशयितांना मडगाव पोलिसांनी उत्तर प्रदेशात अटक केली होती. सध्या संशयित न्यायालयीन कोठडीत आहे. रहीम याच्यावतीने वकील प्रशांत बोरकर हे बाजू मांडत आहेत.

हा व्हिडिओ पहाः Politics | Cabinet meeting | कॅबिनेट बैठकीत कोणते निर्णय झाले?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!