CRIME | गांजा बाळगल्याप्रकरणी पेडणे पोलिसांकडून एकाला अटक

पोलीस निरीक्षक जिबवा दळवी यांची कारवाई; 16,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणेः पेडणे पोलिसांनी अंमली पदार्थ गांजा बेकायदेशीरपणे बाळगल्याप्रकरणी मूळ दिल्लीतील रहिवासी असलेल्या आर्यमिक सेन याला हरमल येथून अटक केली आहे. गुरुवारी रात्री ही कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचाः CRIME | खंडणी मागणाऱ्या टोळीविरोधात आरोपपत्र दाखल

पोलीस निरीक्षक जिबवा दळवी यांची कारवाई

पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांना विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली की हरमल येथील एक व्यक्ती अंमली पदार्थांच्या कामात गुंतली आहे. म्हणूनच अनेक दिवसांपासून पीआय दळवी आणि कर्मचारी सातत्याने आरोपींच्या मागावर होते आणि हरमल येथे उशिरापर्यंत या भागाची तपासणी करत होते.

हेही वाचाः CRIME | मडगावात गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ जप्त

16,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त

3 जून रोजी पोलिसांना माहिती मिळाली की आरोपी हरमल येथे रात्री 9.30 वा. ड्रग्ज आणणार आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे आरोपी व्यक्ती संध्याकाळी हरमल येथे आला आणि पोलिसांनी अचानक छापा टाकला, ज्यादरम्यान त्याच्याकडून अंमली पदार्थ गांजा आढळले. पंचनामा करून गांजा तातडीने ताब्यात घेण्यात आले. जप्त केलेल्या ड्रग्सची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात 16,000/- रुपये आहे. आर्यमिक सेन (23 वय, राहणार गाव वसंत कुंज, दिल्ली) असं आरोपीचं नाव आहे. कायद्याच्या कलम 20 (बी)(ii)(ए) अन्वये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचाः CRIME | चरस बाळगल्याप्रकरणी पेडणे पोलिसांकडून एकाला अटक

पुढील तपास सुरू

पीआय जीवबा दळवी यांनी हा छापा टाकला होता आणि त्यात त्यांना पीएसआय प्रफुल गिरी आणि इतरांनी सहकार्य लाभलं. उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन प्रभुदेसाई आणि उत्तर गोवा पोलीस अधीक्षक आयपीएस शोबित सक्सेना यांच्या देखरेखीखाली पुढील तपास सुरू आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!