CRIME | एलएसडी, गांजा बाळगल्याप्रकरणी एकाला अटक

8 लाख 50 हजाराचा माल जप्त; पेडणे पोलिसांची कारवाई

मकबूल | प्रतिनिधी

पेडणेः पेडणे पोलिसांनी अंमली पदार्थ लिसर्जिक अॅसिड डायएथिलामाईड (एलएसडी) हा द्रव स्वरुपातील महागडा अमली पदार्थ तसंच गांजा बेकायदेशीरपणे बाळगल्याप्रकरणी रशियन नागरिकाला मोरजी येथून अटक केली आहे. बुधवारी ही कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचाः CRIME | कुंडईत भावाकडून भावाचा खून; संशयिताला अटक

पोलीस निरीक्षक जिवबा दळवींची कारवाई

पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांना विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली की मोरजी-पेडणे येथील एक परदेशी व्यक्ती अमली पदार्थांच्या कामात गुंतली आहे. म्हणूनच अनेक दिवसांपासून पीआय दळवी आणि कर्मचारी सातत्याने आरोपींच्या मागावर होते आणि मोरजी येथे उशिरापर्यंत या भागाची तपासणी करत होते.

हेही वाचाः CRIME | हणजुण येथे चोरी प्रकरणी एकास अटक

8 लाख 50 हजाराचा माल जप्त

9 जून रोजी पोलिसांना माहिती मिळाली की आरोपी मोरजी येथे ड्रग्ज आणणार आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे आरोपी मोरजी येथे आला आणि पोलिसांनी अचानक छापा टाकला, ज्यादरम्यान त्याच्याकडून अंमली पदार्थ एसएलडी आणि गांजा आढळले. पंचनामा करून गांजा तातडीने ताब्यात घेण्यात आले. जप्त केलेल्या ड्रग्सची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात 8,50,000/- रुपये आहे.

हेही वाचाः CRIME | हणजुण येथे ड्रग्स प्रकरणी एकास अटक

रशियन नागरिकाला अटक

दिमित्री बोल्डोव्ह (41 वय, रशियन) असं संशयिताचं नाव आहे. एनडीपीएस कायद्याच्या कलम 20 (बी)(ii)(ए) आणि 22 (बी) अन्वये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील पीआय दळवींनी माहिती दिली की, गेस्ट हाऊस मालकाने परदेशी संशयिताचा सी फॉर्म भरला नव्हता आणि म्हणूनच परदेशी कायद्याच्या कलम 14 अन्वये आणखी एक गुन्हा स्वतंत्रपणे दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचाः CRIME | सांतिनेझ गोळीबार प्रकरणातील टोळीला अटक

पुढील तपास सुरू

पीआय जीवबा दळवी यांनी हा छापा टाकला होता आणि त्यात त्यांना पीएसआय हरिश वायंगणकर, कॉन्स्टेबल विनोद पेडणेकर, रोहन वेळगेकर, दयेश खांडेपारकर, विष्णू गाड आणि महेश नाईक यांचं सहकार्य लाभलं. पुढील तपास पोलिस उपअधीक्षक गजानन प्रभुदेसाई आणि पोलीस अधीक्षक (आयपीएस) शोबित सक्सेना यांच्या देखरेखीखाली  सुरू आहे..

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!