CRIME | कुंडईत भावाकडून भावाचा खून; संशयिताला अटक

मंगळवारी रात्रीची घटना; डोक्यात लोखंडी सळीने केला वार; संशयिताला फोंडा पोलिसांकडून अटक

Goan Varta Live | प्रतिनिधी

फोंडाः वाडीवाडा कुंडई येथे प्रभाकर नाईक (४८) यांचा त्याचा सख्खा भाऊ सागर याने डोक्यात सळीने वार करून खून केला. या प्रकरणी संशयित सागर नाईक याला फोंडा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हा खुनाचा प्रकार मंगळवारी रात्री आठच्या सुमारास घडला असल्याचं समजतंय. संशयित सागर नाईक याने दहा वर्षापूर्वी आपला मोठा भाऊ रत्नाकर याच्यावर हल्ला चढवला होता आणि त्याचाही खून केला होता. याप्रकरणी त्याला शिक्षाही झाली होती.

पैशाच्या वादावरून भांडण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाडीवाडा – कुंडई येथील प्रभाकर गुरुदास नाईक यांच्याशी संशयित सागर गुरूदासनाईक (वय ५०) याने भांडण उकरून काढलं. पैशाच्या वादावरून हे भांडण झालं असल्याचं समजतं. या भांडणात सागरने प्रभाकरच्या डोक्यावर सळीने वार केला. त्यात प्रभाकर खाली कोसळून गतप्राण झाला. या प्रकारणाची माहिती फोंडा पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी संशयित सागर याला ताब्यात घेतलं आणि मृतदेह शवचिकित्सेसाठी गोमेकॉत पाठविला.

दहा वर्षांपूर्वी केला होता अजून एका भावाचा खून

दहा वर्षांपूर्वी भाऊ रत्नाकर याच्या खून प्रकरणी सागर अटक करून शिक्षाही झाली होती. हल्लीच तो जेलमधून सुटून आला होता. प्रभाकर हा सागरचा लहान भाऊ असून अविवाहित होता. सागरचं लग्न झालं असून त्याला पत्नी आणि तीन मुलं आहेत. फोंडा पोलिस स्थानकाचे निरीक्षक मोहन गावडे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. पोलिस उपनिरीक्षक नेल्सन अल्बुकर्क यांनी घटनस्थळी भेट देऊन पाहणी केली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!