CRIME | माजोर्डा येथे मजुराचा खून

संशयिताला १२ तासांत अटक; कोलवा पोलिसांची कारवाई

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगाव: माजोर्डा येथील डिसा फर्निचर वर्कशॉपमध्ये काम करणाऱ्या सुफल रबींद्रनाथ शर्मा आणि शुभंकर जना यांच्यात वाद झाला. शुभंकर जना याच्या हल्ल्यात सुफल शर्मा यांचा मृत्यू झाला. कोलवा पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच बारा तासांच्या आत संशयित शुभंकर जना याला अटक करण्यात आली.

हेही वाचाः CRIME | पैसे देत नाही म्हणून बहिणीच्या डोक्यात घातली क्रिकेट बॅट

11 जूनची घटना

माजोर्डा रेल्वेस्थानकानजीक मारामारी सुरू असल्याची माहिती ११ जून रोजी रात्री १०.४५ वा. पोलिसांना मिळाली. त्यानुसार कोलवा पोलीस निरीक्षक, महिला उपनिरीक्षक कविता रावत व रोबोट ५७ वरील कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. मारामारीत जखमी झालेल्या व्यक्तीला हॉस्पिसिओत नेण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती सदर व्यक्ती मृत झाल्याची माहिती दिली. मृत सुफल शर्मा यांचा भाऊ गोपाळ (३३, रा. सध्या माजोर्डा, मूळ पश्चिम बंगाल) यांनी कोलवा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानुसार कोलवा पोलिसांनी कारवाई सुरू केली.

हेही वाचाः CRIME | एलएसडी, गांजा बाळगल्याप्रकरणी एकाला अटक

किरकोळ कारणावरून वाद

माजोर्डा येथील डिसा फर्निचर वर्कशॉपमध्ये सुफल व शुभंकर काम करत होते. शुक्रवारी रात्री त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. वादाचे पर्यावसन मारामारीत झाले. संशयित शुभंकर याने सुफल यांच्यावर खुनी हल्ला केला. यातच सुफल गंभीर जखमी झाले. कोलवा पोलिसांनी जखमी अवस्थेतील सुफल याला हॉस्पिसिओत दाखल केले; मात्र तेथील डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. यानंतर कोलवा पोलिसांनी संशयित शुभंकर याला ताब्यात घेऊन चौकशी केली. नंतर त्याला अटक करण्यात आली. कोलवा पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!