CRIME | हणजुण येथे ड्रग्स प्रकरणी एकास अटक

उमेश झर्मेकर | प्रतिनिधी
म्हापसाः हणजुण येथे गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेने मन्सूर सुलतान अहमद (45) यास अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे 64 हजारांचे अंमलीपदार्थ हस्तगत केले आहेत. संशयित आरोपी मूळ आरामवारी जम्मू काश्मिरचा असून सध्या प्राईसवाडो हणजुण येथे वास्तव्यास होता.
हेही वाचाः CRIME | सांतिनेझ गोळीबार प्रकरणातील टोळीला अटक
शुक्रवारी रात्री केली कारवाई
गुन्हा शाखेने ही कारवाई शुक्रवारी रात्री 10.30 च्या सुमारास केली. प्राईसवाडो हणजूण येथे आतीब हॅण्डीक्राफ्टजवळ अमलीपदार्थ विक्री व्यवहार होणार असल्याची माहिती गुन्हा शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला. संशयित आरोपीच्या येताच त्यांस पोलिस पथकाने पकडलं.
हेही वाचाः CRIME | गांजा बाळगल्याप्रकरणी पेडणे पोलिसांकडून एकाला अटक
64 हजारांचे ड्रग्ज जप्त
संशयिता जवळील बॅगची झडती घेतली असता त्यात दोन हजारांचा 18 ग्रॅम गांजा, 25 हजारांचा 54 ग्रॅम चरस, 22 हजारांचा 3 ग्रॅम निळी पाऊडरवजा ईक्सटसी, 5 हजारांचा 5 ग्रॅम कोकेन आणि 10 हजारांचा 1 ग्रॅम एलएसडी पेपर्स असे एकूण 64 हजारांचे ड्रग्ज सापडले. पोलिसांनी अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंदवून संशयित मन्सूर अहमद यास अटक केली. दरम्यान संशयितास दोन वर्षांपुर्वी हणजुण पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणी अटक केली होती. त्याच्या विरूध्द हा खटला न्यायालयात सुरू आहे. पुढील तपास उपनिरीक्षक गिरीश पाडलोसकर करत आहेत.
हेही वाचाः CRIME | खंडणी मागणाऱ्या टोळीविरोधात आरोपपत्र दाखल
गुन्हा शाखेच्या पोलिसांची कारवाई
गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल परब, नारायण चिमुलकर, उपनिरीक्षक मार्लोन डिसोझा, हवालदार ईशार्द वाटांगी, अशोक गावडे, उमेश देसाई, शिपाई विनायक सावंत, कल्पेश तोरस्कर आणि महाबळेश्वर सावंत या पथकाने ही कारवाई केली.