1 कोटीचे ड्रग्ज जप्त, पेडणे पोलिसांची मोठी कारवाई

राज्यात चक्क ड्रग्जची शेती!

Goan Varta Live | प्रतिनिधी

पेडणे : पेडण्यातून एक मोठी बातमी समोर येतेय. पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांनी ड्रग्जविरोधी केलेल्या कारवाईत तब्बल 1 कोटी रुपये किंमतीचे ड्रग्ज जप्त करण्यात आलेत. केरीमध्ये ही मोठी कारवाई करण्यात आली. यामध्ये चरस, गांजा आणि ड्रग्सनिर्मिती करणाऱ्या वनस्पतींचाही पर्दाफाश करण्यात आला.

केरीमध्ये ड्रग्जची शेती

पेडण्यातील केरीमध्ये ड्रग्सचं उत्पादन होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनंतर पोलिसांनी या माहितीच्या आधारे आपल्या तपासाची चक्र फिरवली आणि ड्रग्स उत्पादन करणाऱ्यांना रंगेहाथ पकडलंय. या कारवाई ड्रग्जसह तिघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. सध्या त्यांची कसून चौकशी सुरु आहे. केरीच्या थोरलेबाब इथं गांजा, चरसची शेती केली होती. एका घराच्या मागे चरस, गांजाचं उत्पादन घेतलं जात होतं, असं पोलिसांनी केलेल्या छापेमारीत समोर आलंय.

1 कोटीचे ड्रग्ज

गांजाचं उत्पादन करणाऱ्या अडीच किलोच्या वनस्पती जप्त करण्यात आल्यात. याची किंमत जवळपास पाच लाख इतकी असल्याचं बोललं जातंय. तर 1 किलो 300 ग्रॅमपेक्षा जास्त गांजाही जप्त करण्यात आलाय. एक लाख तीस हजार किंमतीचा हा गांजा असल्याचं कळतंय. धक्कादायक बाब म्हणजे अडीच किलोपेक्षा जास्त चरस जप्त करण्यात आली. ज्याची किंमत एक कोटी दोन लाख वीस हजार इतकी असल्याचं सांगितलं जातंय. हे सगळे ड्रग्ज पोलिसांनी जप्त केलेत.

या कारवाईत तिघांना अटक करण्यात आली आहे. यात रामा केरकर, वय 22 वर्ष, रश्मी केरकर, वय 44 वर्ष आणि शिवाजी केरकर वय 34 वर्ष, यांच्या मुसक्या आवळण्यात आल्यात. या तिघांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

छापेमारी करणाऱ्या पोलिसांच्या टीममध्ये कोण?

पीआय जीवबा दळवी, पीएसआय संजीत कानोळकर, पीएसआय हरीश वायंगणकर, पीएसआय विवेक हळदणकर, पीसी विनोद पेडणेकर, पीसी रवी मालोजी, पीसी अनिशकुमार पोके, पीसी यशदीप उगवेकर, पीसी जीवन गोवेकर, पीसी महेश नाईक, पीसी उदय गोसावी, मिथिल परब, पीसी भास्कर च्यारी, एलपीसी स्मिता गवस, एलएचजी तृप्ती सातोस्कर.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!