सूनेनंच रचला सासूच्या हत्येचा प्लान? मार्ना शिवोलीतील दुहेरी हत्याकांडप्रकरणी दोघेजण ताब्यात

दोन वृद्ध महिलांची धारदार शस्त्राने हत्या का केली?

उमेश झर्मेकर | प्रतिनिधी

शिवोली : बहिणी असलेल्या दोन वृद्ध महिलांची हत्या करण्यात आली आहे. मार्ना शिवोलीतील या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. वृद्ध महिलेची हत्या करण्याचा कट रचणारी सूनच होती, असा संशय व्यक्त केला जातोय. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं असून अधितृक तपास सुरु आहे.

कुठे घडली घटना?

राज्यातील इग्रजवाडा मार्ना शिवोलीत एक धक्कादायक घटना घडली. रविवारी मध्यरात्री दोन वृद्ध महिलांची हत्या करण्यात आली. या घटनेने मार्ना शिवोलीत एकच खळबळ उडाली. याप्रकरणी दोघा संशयितांनी अटक करण्यात आली आहे.

रोविना लोबो आणि सुबान राजाबली या दोघांना या हत्येप्रकरणी ताब्यात घेण्यात आलं आहे. हणजूण पोलिसांनी ही कारवाई केली आहे. धारदार शस्त्राने दोघा महिलांची हत्या कण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली. 64 वर्षीय मार्टा क्लेमेन्टीना लोबो आणि 62 वर्षांच्या वेरा लोबो यांची हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिस सध्या अधिक तपास करत आहेत.

7 दिवसांची पोलिस कोठडी

या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांनाही सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. म्हापसा जीएमएफसीने ही सुनावणी केली आहे. पोलिस सध्या ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही संशियतांची कसून चौकशी करत आहेत. दोन वृद्ध महिलांची धारदार शस्त्राने हत्या का करण्यात आली, याचा शोध सध्या घेतला जातोय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!