Crime | राज्यात महिला असुरक्षित? साखळी पाळी काटा इथं महिलेला लुटून मारहाण

राज्यात खुलेआम फिरताएक लुटारू

विनायक सामंत | प्रतिनिधी

ब्युरो : साखळीतील पाळी काटा इथं एका महिलेला लुटण्यात आलंय. तसंच तिला मारहाण करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसातही तक्रार दाखल करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आपल्यासोबत घडलेली सगळा प्रसंग या महिलेलं सांगितला आहे.

हेही वाचा – धक्कादायक! कचऱ्याच्या गाडीत आढळलं ७ महिन्यांचं मृत अर्भक

नेमकं काय घडलं?

संध्याकाळच्या सुमारास ही महिला बस स्टॉपवर बसची वाट पाहत थांबली होती. त्यावेळी दोघेजण तिथे होते. अन्य दोघेजण खासगी बसनं निघून गेले. त्यानंतर बस स्थानकावर एकटीच असलेल्या या महिला एका भगव्या रंगाच्या कारमधून एक जण आला आणि त्यानं या महिलेला लुटलं. या महिलेजवळील पर्स, काही महत्त्वाच्या चाव्या आणि दोन चैन लुटण्यात आल्या. यावेळी या महिलेला मारहाणही करण्यात आली.

हेही वाचा – घरगुती वाद सार्वजनिक करणाऱ्या धक्कादायक Videoनं गुंता वाढवला

याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. सीसीटीव्हीच्या मदतीनं संशयित आरोपीची गाडी कॅमेऱ्यात कैद झाली असल्याचं पाहायला मिळतंय. सध्या भामई पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. उषा बोरकर असं पीडित महिलेचं नाव आहे.

लुटारुंचा अड्डा

दरम्यान, या घटनेनंतर स्थानिक पंच करीष्मा कामत यांनी जी प्रतिक्रिया दिली आहे ती आणखीनच भीतीदायक आहे. कारण ज्या ठिकाणी या महिलेला लुटलंय ते ठिकाणच धोकादायक असल्याचं आणि असे प्रसंग वारंवार तिथं घडत असल्याचा दावा त्यांनी केलीय. पाळी काटा इथं याआधीही बलात्कार, छेडछाड, लुटमारीचे प्रसंग घडले आहेत. त्यामुळे हे ठिकाण लुटारुंचा अड्डाच बनतंय की काय, असा सवालही उपस्थित करण्यात आलाय. त्यामुळे सरकारनं काहीतरी ठोस पावलं उचलली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

हेही वाचा – आताच अलर्ट व्हा! किनाऱ्याचा रंग बदलण्यामागचं धक्कादायक सत्य!

10 दिवसांपूर्वीही अशीच घटना

बरोबर दहा दिवसांपूर्वीच म्हणजे 4 एप्रिललाही अज्ञात दुचाकीस्वार चोरट्यांनी दोघा महिलांचे मंगळसूत्र हिसकावल्याच्या दोन घटना समोर आल्या होत्या. डांगी कॉलनी, म्हापसा येथे ८० हजारांचे, तर कुर्टी-फोंड्यात दीड लाखांचे मंगळसूत्र लंपास करुन सोनसाखळी चोरांनी धुमाकूळ घातला होता. दुकानावर खाऊ घेण्याच्या बहाण्याने आलेल्या चोरट्यांनी हा प्रताप केला होता. त्यामुळे राज्यात कायद्याचा धाक उरलाय की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!