सेक्स रॅकेटच्या सूत्रधाराला क्राईम ब्रँचकडून बेड्या

गोवा पोलिसांची दिल्लीत कारवाई

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : गोव्यात सेक्स रॅकेट चालविणार्‍या राहुल गुप्ता या कुख्यात मानवी तस्कराला दिल्लीत बेड्यात ठोकण्यात गोवा क्राईम ब्रँचच्या पोलिसांना यश आलंय.

अनेक मुलींना वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त करण्यात राहुल गुप्ता याचा हात होता. त्याच्या मागावर गोवा पोलिस होते. मात्र तो सहजासहजी हाती लागत नव्हता. अखेर गोवा पोलिसांच्या क्राईम ब्रँचनं त्याला दिल्लीत बेड्या ठोकल्या.

राहुल, प्रिन्स की मयंक?

राहुल गुप्ता अनेक नावांनी सेक्स रॅकेट चालवत असे. कधी प्रिन्स, तर कधी मयंक या नावानं त्यानं अनेक युवतींना आपल्या नादी लावलं. मात्र हे करत असताना तो वेगवेगळी नावं वापरत असल्यानं त्याच्याबाबत पोलिसांतही संभ्रम होता. अखेरीस क्राईम ब्रँचचे निरीक्षक लक्षी आमोणकर यांच्या नेतृत्वाखाली गोवा पोलिसांनी राहुल गुप्ताचा ठावठिकाणा शोधला आणि दिल्लीत जा÷उन अटक केली.

वेश्या व्यवसायाचा काळा डाग

जगातील सर्वोत्तम पर्यटन स्थळांपैकी एक असलेल्या गोव्यालाही वेश्या व्यवसायाचा काळा डाग लागला आहे. गोवा पोलिस अधूनमधून सेक्स रॅकेट्सचा पर्दाफाश करत असतात. मात्र मुख्य सूत्रधार नामानिराळे राहत असल्यानं काही दिवसांनी नव्या युवतींना गोव्यात आणून वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केलं जातं. राहुल गुप्ताच्या अटकेनं गोवा पोलिसांना एक मोठा गुन्हेगार हाती लागला असून या गुन्ह्यासंबंधी आणखी सूत्रधार कार्यरत आहेत का, याचा उलगडा होउ शकतो.

हेही वाचा…

स्वप्नील वाळके खूनप्रकरणी बिहारमधून तिघांना अटक

पत्ता विचारायला आले आणि सोन्याची चैन पळवून गेले

पर्वरी ATM चोरी प्रकरण : तिघांना दिल्लीतून पकडलं

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!