मडगावात बेकायदा कॅसिनोचा पर्दाफाश

मिनी कॅसिनो चालकसह २१ जणांना अटक; २ लाख ४ हजार ७०० रोख रक्कम जप्त

प्रसाद शेट काणकोणकर | प्रतिनिधी

पणजी: गोवा पोलिसाच्या गुन्हा शाखेने मंगळवारी मध्यरात्री कालकोंड- मडगाव येथील एका परिसरात छापा टाकून मिनी कॅसिनोचा पर्दाफाश करून सबंधित परिसर सील केला आहे. या प्रकरणी गुन्हा शाखेने रेहान मुझावर या मिनी कॅसिनो चालकसह २१ जणांना अटक करून नंतर हमीवर सुटका करण्यात आली आहे. या वेळी त्याच्याकडून २ लाख ४ हजार ७०० रोख रक्कम आणि ८४ लाख ५ हजार रुपये किंमतीच्या चिप्स तसेच कॅसिनो मशीन, मोबाईल आणि इतर वस्तू जप्त केली आहे.

हेही वाचाः ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्रा डायमंड लीगला हुकणार

मंगळवारी मध्यरात्री टाकला छापा

गुन्हा शाखेने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी गुन्हा शाखेच्या एका उपनिरीक्षकाला सबंधित ठिकाणी बेकायदेशीर मिनी कॅसिनो सुरु असल्याची माहिती दिली होती. त्यानुसार, गुन्हा शाखेचे पोलीस अधीक्षक शोबित सक्सेना, उपअधीक्षक सुनिता सावंत आणि गुरुदास गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक लक्षी आमोणकर आणि सतिश गावडे याच्या नेतृत्त्वाखाली पोलीस उपनिरीक्षक गिरीष पाडलोस्कर, जयराम कुंकळेंकर, सहाय्यक उपनिरीक्षक किशोर नाईक, हवालदार अशोक गावडे, विजय आवखाले, उमेश देसाई, पोलीस कॅन्स्टेबल गौरिष नाईक, संकल्प नाईक, प्रकाश उतेकेरी, स्वप्निल शिमेपुरुषकर, विनायक व इतर पथकाने मंगळवारी रात्री ९.१५ ते मध्यरात्री १२.०० दरम्यान कालकोंड- मडगाव येथील राजेंद्र प्रसाद मैदानाजवळ असलेल्या एका इमारतीच्या पहिला मजल्यावर छापा टाकला. या वेळी पथकाने बेकायदेशीर मिनी कॅसिनोचे चालक रेहान मुझावर याला अटक केली.

संशयितांना अटक

या वेळी पथकाने किस्मत कामत, ऋषभ नाईक, सेल्विन कुलासो, आकाश खुटकर, आयवन रॅड्रिग्ज, शैलेश वेळीप, श्रीपाद नाईक आणि रुपेश बांदेकर या कर्मचाऱयासह कॅसिनो खेळणारे ग्राहक मोईन शेख, निझामुदीन मस्सूर, आरिफ हुनसीमुरद, सरवार सय्यद, रिजवान सय्यद, दुपेंद्र पुन, असलम खान, मुस्ताफा शेख, जुझे पेरेरा, सऱफराज खान, सय्यद अली शेख आणि जहीर खानापुरी या संशयितांना अटक केली आहे.

हेही वाचाः रेल्वे तिकीट बुक करण्यासाठी आता ‘ही’ कागदपत्रे आवश्यक! IRCTC करत आहे तयारी

२ लाख ४ हजार ७०० रोख रक्कम जप्त

पथकाने त्यांच्याकडून २ लाख ४ हजार ७०० रोख रक्कम आणि ८४ लाख ५ हजार रुपये किंमतीच्या चिप्स तसंच कॅसिनो मशीन, मोबाईल आणि इतर वस्तू जप्त करून सबंधित परिसर सील केला आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक जयराम कुंकळेकर यांनी गोवा सार्वजनिक जुगार प्रतिबंदक कायद्याचे कलम ३ आणि ४ अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर अटक करण्यात आलेल्या सर्व संशयितांना हमीवर सुटका करण्यात आली.  

हेही वाचाः जून, जुलैमध्ये राज्यातील २६६ जणांना डेंग्यू!

एका महिन्याअगोदर सुरू केला होता कॅसिनो

दरम्यान पथकाने संशयिताची अधिक चौकशी केली असता, रेहान मुझावर याने एका महिन्याअगोदर सबंधित ठिकाण भाडेपट्टीवर घेऊन बेकायदेशीर मिनी कॅसिनो सुरु केल्याची माहिती समोर आली आहे.    

हा व्हिडिओ पहाः Politics | Tanawde sampark yatra| तानावडेंची कार्यकर्ता संपर्क यात्रा

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!