ROBBERY | घरफोडीप्रकरणी दोघांना अटक

शिरसई, थिवी येथील घटना; दीड लाख रुपयांचा ऐवज लंपास

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगाव: राज्यात चोरांचा सुळसुळाट झाला आहे. त्याचप्रमाणे गुन्हेगारीच्या प्रकरणांमध्येही वाढ झालेली पहायला मिळतेय. मडगाव येथे असाच एक चोरीचा प्रकार घडलाय. मात्र पोलिसांना चोरांना पकडण्यात यश आल्यानं स्थानिकांकडून दिलासा व्यक्त करण्यात येतोय.

हेही वाचाः पुरामुळे फोंडा तालुक्यात ४२६ घरांची हानी

कुठे झाली चोरी?

शिरसई, थिवी येथील घर फोडून सुमारे दीड लाख रुपयांचा ऐवज लंपास करून फरार असलेले संशयि कोकण रेल्वे पोलिसांच्या हाती लागले. संशयित सत्य वाडार (३५ , बिजापूर) आणि नीरज सोनकर (१९, उत्तर प्रदेश) हे पळून जाण्याच्या तयारीत असताना कोकण रेल्वे पोलिसांनी शुक्रवारी त्यांना अटक केली.

हेही वाचाः विनावापर शाळांच्या वास्तू फोंडा तालुक्यात सर्वाधिक

कोकण रेल्वे पोलिसांनी पकडलं

कोकण रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ जून रोजी ही घटना घडली. यावेळी या चोरट्यांनी सिम्पसन आल्मेदा यांचं घर फोडून लॅपटॉप, सोन्याचे दागिने, रोकड मिळून सुमारे दीड लाखांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी कोलवाळे पोलिस स्थानकात तक्रार नोंद करण्यात आली आहे. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार कोकण रेल्वे पोलिसांनी ही कारवाई केली.

हेही वाचाः ३०० गरोदर महिलांनी घेतला कोविड लसीचा पहिला डोस

सत्य वाडार याला रेल्वे पोलिसांनी ताब्यात ठेवलं आहे, तर नीरज सोनकार याला कोलवाळे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.

हा व्हिडिओ पहाः Video | LABOURS | COVID | परप्रांतीय मजुरांची पत्रादेवीत गर्दी

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!