खळबळजनक! जीवघेण्या हल्ल्यात कुख्यात गुंड टायगर गंभीर जखमी

दिवसाढवळ्या जीवघेणा हल्ला! कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगाव : राज्याच्या गुन्हेगारी विश्वातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. कुख्यात गुंड अनवर शेख उर्फ टायगरवर जीवघेणा हल्ला झालाय. मडगावात झालेल्या या हल्ल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

टायगर जखमी

मडगावमध्ये दिवसाढवळ्या कुख्यात गुंडावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात कुख्यात गुंड अनवर शेख उर्फ टायगर गंभीररीत्या जखमी झालाय. त्याच्यावर जिल्हा रुग्णालया सध्या उपचार सुरु आहे. महत्त्वाचं म्हणजे हल्ला करणाऱ्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. हल्ला करणाऱ्याचं नाव रिकी होर्णेकर असल्याची माहिती मिळतेय. तर याप्रकरणी इतर दोघे फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. दिवसाढवळ्या झालेल्या या जीवघेण्या हल्ल्यानं राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न अधोरेखित होतोय. खुलेआम गुंड एकमेकांशी भिडत असल्यानं राज्यात कायद्याचा धाक राहिला आहे की नाही, असा सवाल उपस्थित केला जातोय.

अधिक तपास सुरु

फातोर्डा आले जंक्शनवर हा थरार घडला. मंगळवारी दुपारी घडलेल्या या घडनेनं एकच खळबळ उडाली आहे. पोलिसही आता याप्रकरणी अधिक तपास करताएत. कुख्यात गुंड अनवर शेखचं नाव अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये घेतलं जातं. अनेकदा त्याला पोलिसांनी ताब्यातही घेतलं होतं. फक्त गोव्यातच नव्हे, तर गोव्याबाहेरी आपल्या उपद्रवी कारनाम्यांमुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती.

कशामुळे हल्ला?

दरम्यान, आता अनवर शेखवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानं अनेक सवाल उपस्थित केले आहेत. या हल्ल्याचं नेमकं कारण काय? या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार कोण?, या प्रश्नांची उत्तर पोलिस तपासातूनच समोर येतील. तोपर्यंत राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर चित्र विचित्र प्रतिक्रिया उमटत राहणार, हे नक्की.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!