दत्ता खोलकरांविरुद्ध आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा

साईबाबा मंदिरात महिलांची सभा घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Goan Varta Live | प्रतिनिधी

म्हापसा : साळगाव मतदार संघातील सांगोल्डा येथे साईबाबा मंदिरात महिलांची सभा घेतल्याप्रकरणी भाजप नेते दत्ता खोलकर यांच्याविरुद्ध साळगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी रात्री आयोजित या सभेत सुमारे ४० ते ५० महिलांची उपस्थिती होती.

हेही वाचाः माझ्या नावाचा चुकीच्या पद्धतीने वापर…

पाच पेक्षा जास्त लोकांना घेऊन प्रचारासही मनाई

निवडणूक आयोगाने राजकीय पक्ष व उमेदवारांना करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जाहीर सभा आयोजित करण्यास मनाई केली आहे. तसेच पाच पेक्षा जास्त लोकांना घेऊन प्रचारासही मनाई केली आहे. अशावेळी सांगोल्डा येथे सभा घेऊन निवडणूक आचारसंहिता तसेच करोनाच्या मार्गदर्शक सूचींचे उल्लंघन करणे शिवाय करोनासारख्या महामारीचा प्रसार रोखण्यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांनी जारी केलेल्या १४४ सीआरपीसी आदेशाचे देखील उल्लंघन केल्याचा ठपका ठेऊन हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

हेही वाचाः५० कोटी घेऊन नवीन पक्षात प्रवेश !…

१८८ व २६९ कलमांखाली गुन्हा दाखल

साळगाव पोलिसांनी भरारी पथकाचे दंडाधिकारी वाय. डी. तांबोसकर यांच्या तक्रारीच्या आधारे भाजप नेते संशयित दत्ता खोलकर यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या १८८ व २६९ कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक तुकाराम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अतिकेश खेडेकर करत आहेत.     

हेही वाचाः कारची झाडाला धडक बसल्याने अपघात

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!