CRIME | जन्मठेपेची शिक्षा रद्द; 10 वर्षांचा सश्रम कारावासाची शिक्षा

2013 सालचं प्रकरण; जन्मदात्या आईचा मुलाकडून खून; दारूच्या नशेत घेतला बळी

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: आईचा खून केल्या प्रकरणी आरोपी रवी शिरोडकर याची जन्मठेपेची शिक्षा रद्द करून १० वर्षाचा सश्रम कारावासाची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने केली आहे. याबाबतचा निवाडा न्यायमूर्ती महेश सोनक आणि एम. एस. जवळकर या द्वसदस्यी खंडपीठाने दिला आहे.

हेही वाचाः निवृत्त खलाशांसाठी गोवा सरकारची नवी पेन्शन योजना

हणजुण पोलिसांनी केलं होतं म्हापसा सत्र न्यायालयात आरोपत्र दाखल

या प्रकरणी हणजुण पोलिसांनी म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात १० जून २०१३ रोजी आरोपपत्र दाखल केलं होतं. त्यानुसार, आरोपी रवी शिरोडकर याने २४ फेब्रुवारी २०१३ रोजी दुपारी २ ते ५-३० च्या दरम्यान दारूच्या नशेत शुल्लक कारण्यामुळे ७४ वर्षीय आपली आई नली शिरोडकर हिला मारहाण करण्यात आल्याचं म्हटलं होतं. त्यात तिच्या मृत्यू झाला होता. त्यामुळे पोलिसांनी नली शिरोडकर हिच्या खून केल्या प्रकरणी आरोपी रवी याच्या विरोधात भादंसंच्या कलम ३०२ नुसार आरोप ठेवण्यात आला होता.

हेही वाचाः भाजप-काँग्रेसची राजकीय टोलेबाजी

२५ सप्टेंबर २०१४ रोजी खटल्याला सुरुवात

या प्रकरणी न्यायालयाने २५ सप्टेंबर २०१४ रोजी आरोप निश्चित करून खटला सुरु केला होता. त्यानुसार, न्यायालयात १२ साक्षीदारांची उलटतपासणी करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने ३१ मार्च २०१६ रोजी आरोपी रवी शिरोडकर याला आईचा खून केल्या प्रकरणी जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली होती. या शिक्षेला आरोपी रवी शिरोडकर याने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिलं.

हेही वाचाः बार्देशचे उपजिल्हाधिकारी कपिल फडते यांची अचानक बदली

१० वर्षाचा सश्रम कारावासाची शिक्षा

या प्रकरणी खंडपीठाने सुनावणी घेतली असता, आरोपी रवी शिरोडकर याच्या आईचा खून करण्याचा इरादा नसल्याचं स्पष्ट झालं. तसंच दारुसाठी पैसाची मागणी केली होती. ते मिळाले नसल्यामुळे त्याच्या वाद होऊन त्याने तिच्यावर दंडुकांने वार केल्यामुळे तिचा मृत्यू झाला असं निरीक्षण नोंदवलं. तसंच घटनेवेळी प्रत्यक्ष साक्षीदार नसल्याचा फायदा आरोपीला देत खंडपीठाने आरोपी रवी शिरोडकर याची जन्मठेपेची शिक्षा रद्द केली. तर आरोपीला भादंसंच्या ३०४ (ii) कलमअंतर्गत दोषी ठरवून १० वर्षाचा सश्रम कारावासाची शिक्षा आणि पाच हजार रुपये दंड ठोठावले. या प्रकरणी कायदा विधी सेवेमार्फत आरोपीच्यातर्फे वकील अनुप गावकर याने बाजू मांडली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!