CRIME | काणकोणात गांजा जप्त; एकास अटक

केरळच्या एकाला अटक; दोन दिवसांच्या रिमांडवर

संजय कोमरपंत | प्रतिनिधी

काणकोण: राज्यात अमली पदार्थ विरोधात कारवाई करण्यात आली आहे. काणकोण येथे ही कारवाई करण्यात आली आहे. मंगळवारी मध्यरात्री भाटपाल येथील एका घरातून मूळ केरळ येथील एका 38 वर्षीय व्यक्तीला गांजा बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

हेही वाचाः CRIME UPDATE | रॉय फर्नांडिस मारहाण प्रकरणी तिघांना अटक

मंगळवारी रात्री पोलिसांकडून कारवाई

मंगळवारी रात्री १२च्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे. ९२१०० रूपये किंमतीचा गांजा संशयिताकडून जप्त करण्यात आला आहे. मूळ येल्लापे केरळ आणि सध्या नीववाडा भाटपाल येथे राहणाऱ्या राजीव (३८) या व्यक्तीला अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी काणकोण पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अधिक माहितीकरीता त्याला दोन दिवसाच्या रिमांडवर घेतलं आहे.

हेही वाचाः CRIME | जन्मठेपेची शिक्षा रद्द; 10 वर्षांचा सश्रम कारावासाची शिक्षा

पुढील तपास सुरू

या प्रकरणातील पुढील तपास निरीक्षक तुळशीदास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक स्वदेश देसाई करत आहेत. राज्यात अमली पदार्थांविरुद्धच्या कारवाया वाढल्या असून राज्याला अमली पदार्थ मु्क्त करण्याचं लक्ष्य गोवा पोलिसांनी समोर ठेवलं आहे.

हा व्हिडिओ पहाः Video | Crime | Sucide | आत्महत्याप्रकरणाचा तपास आता क्राईम ब्रांचकडे

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!