रविवारपासून राज्यात कर्फ्यू; अत्यावश्यक सेवा वगळता ‘या’ गोष्टी असणार बंद

राज्यात ‘कर्फ्यू’च्या पार्श्वभूमीवर वाचा काय सुरू, काय बंद

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : कोरोनाची दुसरी लाट धोकादायक असल्याचं नमूद करत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी रविवार 9 मे पासून 15 दिवसांचा राज्यव्यापी कर्फ्यू जाहीर केला. रविवार दि. 23 मे पर्यंत हा कर्फ्यू जारी असेल. यासंबंधी शनिवारी अधिकृत नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर गोवा जिल्हाधिकारी अजित रॉय यांनी एक आदेश काढलाय. यात अत्यावश्यक सेवा वगळता काय बंद असणार आहे याविषयी सांगण्यात आलंय.

हेही वाचाः 83 महिला सैनिकांची पहिली तुकडी भारतीय लष्करात सामील

या गोष्टी असणार बंद

कसिनो; बार्स, रेस्टॉरंट्स (रेस्टॉरंट्सच्या किचनला होम डिलिव्हरीसाठी परवानही आहे); दुकानं (होम डिलिव्हरीसाठी खुली); स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स/ऑडिटोरियम्स/कम्युनिटी हॉल्स आणि तत्सम जागा; रिव्हर क्रूझ/वॉटर पार्क/एन्टरटेन्मेंट पार्क; जीम/स्पा/मसाज पार्लर्स/सलून; सिनेमागृह, थिएटर, मल्टिप्लेक्स, शॉपिंग मॉलमधील एन्टरटेन्मेंट झोन्स; स्विमिंग पूल; शाळा, महाविद्यालये, एज्युकेशनल आणि कोचिंग इन्स्टिट्यूशन्स, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षांसाठी वगळता; सार्वजनिक ठिकाणची धार्मिक ठिकाणं (पुजाऱ्यांकडून रोजची पुजा करण्यास परवानगी आहे) ; आठवडी बाजार, मासळी बाजार आणि नगरपालिका/पंचायत बाजारपेठा बंद असतील.

हेही वाचाः कोरोनाच्या विरोधातील लढाईला बळ येणार! आणखी एका औषधाला मंजुरी

या गोष्टींवर प्रतिबंधित

  • सामाजिक/राजकीय/क्रीडा/मनोरंजन/शैक्षणिक/सांस्कृतिक कार्यक्रम, लग्नसमारंभ आणि इतर धार्मिक सभा (सरकारची परवानगी असलेले कार्यक्रम वगळता) यावर प्रतिबंध आहे. 20 किंवा त्याहून कमी लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यास परवानगी आहे.
  • सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त लोकांना जमण्यास परवानगी नाही (अधिकृत कार्यक्रम किंवा डीएम/एसडीएम यांच्या परवानगीने होणारे कार्यक्रम वगळता)
  • 10 मे पासून आंतरराज्य पर्यटकांच्या येण्या-जाण्यावर प्रतिबंध असेल. (गोव्यातील रहिवासी किंवा गोव्यात कामानिमित्त येणारे, किंवा ज्यांच्याकडे लसीकरणाचं सर्टिफिकेट असेल किंवा 72 तास अगोदर केलेला कोविड निगेटिव्ह टेस्ट रिपोर्ट असेल त्यांनाच गोव्यात येण्याची परवानगी मिळेल.)
  • बसेसच्या वापरावर प्रतिबंध आहे. केवळ कामावर जाणारे लोक किंवा वैद्यकीय निकड यांनाच परवानगी आहे, ते ही 50 टक्के क्षमतेसह.

हेही वाचाः बाबू आजगावकर पेडणेकरांच्या डोळ्यात धूळ फेकतायत

केवळ यांनाच परवानगी

  • औषधं किंवा तत्सम गोष्टींची विक्री करणारी दुकानं
  • किराणा सामान/खाद्य पदार्थ, प्राण्यांचे अन्न, सार्वजनिक वितरण व्यवस्था आणि तत्सम आउटलेट्स, स्वतंत्र मद्यविक्री दुकानं (फक्त ‘टेक अवे’साठी) सकाळी 7 ते दुपारी 1 पर्यंत खुली राहतील (मद्य वगळता या सर्व वस्तूंच्या होम डिलिव्हरीस परवानगी आहे)
  • बॅंका, इन्श्युरन्स, कस्टम क्लिअरन्स, एटीएम्स, मायक्रोफायनान्स इन्टिट्यूशन्स इ.ना परवानगी आहे.
  • सर्व वैद्यकीय आणि आरोग्य सेवा/इन्टिट्यूशन्स (आयुश आणि पशुवैद्यकीय हॉस्पिटल्स आणि लेबॉरेटरीज) हे कार्यरत असतील.
  • मुले/दिव्यांग/विशेष मुलं/ज्येष्ठ नागरिक/महिला/विधवा इ. साठी काम करणाऱ्या संस्थांना काम करण्याची परवानगी आहे.
  • निरीक्षण घरे, केअर होम आणि किशोरवयीन मुलांसाठी सुरक्षिततेची ठिकाणे इ.ना काम करण्याची परवानगी आहे. 
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!