सासष्टी सेटिंग! भाजप-कॉंग्रेसची निवडणूक पूर्व सेटिंग

एड. अमित पालेकर यांची घणाघाती टीका

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः भाजप-काँग्रेसची एकी निवडणुकीनंतरच्या सेटिंगसाठी ओळखला जाते. पण यावेळी ते निवडणूकपूर्व सेटिंगमध्ये व्यस्त आहेत, अशी टीका ‘आप’ नेते अमित पालेकर यांनी केली. मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पालेकर यांच्या सोबत ‘आप’चे उपाध्यक्ष व्हेंझी व्हिएगासही उपस्थित होते.

मतदारांचा विश्वासघात करून भाजपमध्ये प्रवेश केला

2017 च्या निवडणुकीत काय घडले ते आम्ही पाहिले आहे. मतदारांनी काँग्रेस नेत्यांनावर विश्वास ठेवून त्यांना मतदान केले. मात्र त्यांनी या मतदारांचा विश्वासघात करून भाजपमध्ये प्रवेश केला याची आठवण पालेकर यांनी करून दिली.

चुका करणाऱ्यांनाच नजरेला नजर भिडवण्याची हिम्मत नसते

मध्यरात्री पत्रकारांनी एलेक्स रेजिनाल्ड यांना त्याच हॉटेलमधून बाहेर पडताना पाहिले, जिथे भाजपचे वरिष्ठ नेते उतरले होते. रेजिनाल्ड यांना हॉटेलमध्ये येण्याबाबत विचारले असता, ते उत्तर देऊ शकेल नाही आणि घाईघाईने तिथून निघून गेले. ज्यांच्याकडून चुका होतात त्यांनाच नजरेला नजर भिडवण्याची हिम्मत नसते, त्यामुळे ते उत्तर देऊ शकले नाहीत, असं पालेकरांनी म्हटलं.

भाजप-काँग्रेस एकी गोव्यासाठी नवीन नाही

भाजप-काँग्रेस यांच्यातील एकी गोव्यासाठी नवीन नाही. मागील निवडणुकीत, 2017 मध्ये दोन्ही पक्षांनी मतदानानंतरच्या सेटिंगमध्ये गुंतलेले पाहिले. मात्र, यावेळी दोन्ही पक्ष मतदानपूर्व सेटिंग करण्यात व्यस्त आहेत असं ते पुढे म्हणाले. गेल्या पाच वर्षांत अदृश्य असलेला काँग्रेस, कोविड काळातही गायब होता. एकीकडे भाजप व्हेंटिलेटर आणि इतर वैद्यकीय उपकरणांच्या नावाखाली भ्रष्टाचार करण्यात मग्न होता, तर दुसरीकडे काँग्रेसचे दोन नेते वगळता बाकीचे सर्व गायब होते. कोविड काळात गोंयकारांच्या पाठीशी उभा राहणारा ‘आप’ हा एकमेव पक्ष होता, असं पालयेकर म्हणाले.

‘आप’ला गोंयकारांकडून चांगला प्रतिसाद

सध्या काही ‘आप’ नेते घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत आणि आम्हाला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोविडच्या काळात काम केलेल्या ‘आप’ नेत्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे आणि ते ‘आप’ सोबत राहतील असा विश्वास पालेकरांनी व्यक्त केला.

मात्र कॅमेरात केवळ रेजिनाल्ड कैद झाले

भाजप, ज्यांना ते सासष्टीत विजयी होतील याबद्दल पुरेसा आत्मविश्वास नाही, ते त्यांच्या बी टीम म्हणजेच काँग्रेससह मतदानपूर्व सेटिंगमध्ये गुंतले आहेत. मध्यरात्री केवळ रेजिनाल्डच नाही, तर दिगंबर कामत, गिरीश चोडणकर आणि एलेक्स सिक्वेरा या काँग्रेस नेत्यांनीही फडणवीस यांची भेट घेतली. मात्र कॅमेरात केवळ रेजिनाल्ड कैद झाले, असा आरोप उपाध्यक्ष व्हेन्झी व्हिएगास यांनी केला.

सासष्टीच्या जागा जिंकून नंतर भाजपमध्ये जाण्याचा काँग्रेसचा डाव

सासष्टीच्या जागा जिंकून नंतर भाजपमध्ये जाण्याचा काँग्रेसचा डाव आहे. हे विधान चुकीचे असेल, तर काँग्रेस नेत्यांनी पुढे येऊन माध्यमांसमोर स्पष्टीकरण द्यावे, असं आव्हान व्हिएगस यांनी केलं. संपूर्ण काँग्रेस मतदानपूर्व सेटिंगमध्ये गुंतलेली आहेत, त्यामुळेच रेजिनाल्ड फडणवीस यांच्या भेटीवर कोणीही भाष्य किंवा आक्षेप घेत नाही, असं व्हिएगस म्हणाले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!