कोविशिल्ड लस कोविडविरुद्ध लढण्यासाठी लाईफ-लाँग प्रतिकारशक्ती देऊ शकते – डॉ. राजेंद्र बोरकर

फक्त लसीकरण पुरेसं नाही, कोविड नियमावलीचं पालन करणंदेखील आवश्यक

श्याम सूर्या नाईक | प्रतिनिधी

वास्कोः कोविशिल्ड लस कोविड-१९ विषाणूविरूद्ध लढण्यासाठी लाईफ-लाँग प्रतिकारशक्ती देऊ शकते, असं प्रतिपादन गोवा राज्य लसीकरण प्रमुख डॉ. राजेंद्र बोरकर यांनी सोमवारी केलं. आरोग्य सेवा संचालनालयाच्या वतीने चिखली उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये आयोजित ‘संघन दस्त नियंत्रण पंधरडा’ अतिदक्षता कार्यक्रमात पत्रकारांशी बोलत होते.

हेही वाचाः मोफत वीज नाहीच देणार…

ज्यांनी लस घेतली नाही, त्यांनी ती लवकर घ्यावी

आपण असं म्हणू शकतो की कालपर्यंत कमीतकमी १० लाख लोकांनी कोविशिल्डचा पहिला डोस घेतला आणि त्यांच्या संरक्षणाची पातळी ६० टक्क्यांपर्यंत पोचवली आहे, तर जवळपास २.५ लाख लोकांना दुसरा डोस मिळाला आहे. आता संरक्षण पातळी जवळपास ८० टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. आम्हाला असं वाटतं गोव्यात १८ वर्षांवरील लोकांची अंदाजे लोकसंख्या ११,९४,३२९ आहे आणि त्यामुळे राज्यातील लसीकरण कव्हरेज सुमारे ८३ टक्क्यांपर्यंत पोहचली आहे. हे लक्षात घेता उर्वरित लोकांनी लवकरात लवकर लस घ्यावी असं आवाहन डॉ. बोरकरांनी केलं.

हेही वाचाः वाळवंटीवरील बंधारे ठरतात पूराला कारणीभूत

कोविशिल्ड लस लाईफ-लाँग प्रतिकार शक्ती वाढवते

यूकेमध्ये नुकत्याच झालेल्या अभ्यासात असं आढळलं आहे की भारतात कोविशिल्ड म्हणून ओळखल्या जाणार्‍या अ‍ॅस्ट्रा झेनिका लस कोविड-१९ विषाणूविरूद्ध आजीवन प्रतिकारशक्ती प्रदान करते आणि यापेक्षा दुसरी मोठी बातमी कोणतीच नाही. लोक दुष्परिणामांबद्दल बोलू शकतात. परंतु आम्ही संपूर्ण भारतात ४० कोटी लसी दिल्या आहेत आणि आम्ही पाहिलं आहे की यातील जोखीम ही लाभांच्या तुलनेत कमी आहेत. ही लस सुरक्षित आणि विनामूल्य आहे. लोकांनी लसीकरणासाठी पुढे येण्याची गरज आहे. स्वत:ला आणि गोव्याला वाचवण्यासाठी लसीकरण करण्यासाठी लसीकरण केंद्रावर नाव नोंदणी करा, असं आवाहन डॉ. बोरकरांनी केलं.

हेही वाचाः दिगंबर कामतांनी वाहिली प्रा. गोपाळराव मयेकरांना आदरांजली

लसीकरण हाच एकमेव मार्ग

गोवा सरकारने गरोदर महिला धरून सर्व श्रेणीतील लोकांना लस दिली आहे आणि आता गोव्यातील नेपाळी लोकांसाठी तसंच परदेशी नागरिकांच्या लसीकरणासाठी सरकारकडून दिशानिर्देश जारी करण्याच्या प्रतीक्षेत आरोग्य विभाग आहे. लसीकरण हा एकमेव मार्ग आहे, ज्यामुळे आपण तिसर्‍या लाटेला येण्यापासून रोखू शकतो. लसीकरण न झाल्यास कोविडच्या प्रकरणांमध्ये वाढ होण्याची भीती आहे. कारण गणेश चतुर्थीसारख्या सणादरम्यान कोविड वेगाने वाढू शकतो. लस घेऊन जर आम्ही योग्यरीत्या खबरदारी घेतली नाही, किंवा नियमांंचं पालन केलं नाही, तर एखाद्याला कोविड संसर्ग होऊ शकतो, असं डॉ. बोरकर म्हणाले.

हा व्हिडिओ पहाः Video | Flood effect 2021 | Bardes | बार्देशमध्ये तब्बल ३८ लाख रुपयांचं नुकसान

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!