कोविशिल्ड की कोवॅक्सिन? पहा, काय म्हणतंय संशोधन…

दोन्ही लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या 515 आरोग्य कर्मचाऱ्यांचा संशोधनात सहभाग

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : सर्वात प्रभावी कोविशिल्ड की कोवॅक्सिन ही चर्चा गेली कित्येक दिवस सुरू आहे. मात्र यासंदर्भात सुरू असलेल्या संशोधनातुन एक बातमी पुढं येतेय, ती म्हणजे कोवॅक्सिनपेक्षा कोविशिल्ड अधिक अॅंटीबॉडीज तयार करते.

या संशोधनात दोन्ही प्रकारच्या लसींचे दोन्ही डोस घेतलेल्या डाॅक्टर आणि नर्सना सहभागी करण्यात आलं होतं. त्यात हे स्पष्ट झालं की सीरम इन्स्टिटयूटची कोविशिल्ड, भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनपेक्षा अधिक प्रभावी काम करते. कोरोनाव्हायरस व्हॅकसिन-प्रेरित अँटीबॉडी टायट्र नावाच्या या संशोधनात 515 आरोग्य कर्मचा-यांचा समावेश होता. यात 305 पुरूष आणि 210 महीला होत्या. संशोधनानुसार, कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोघांनीही चांगली रोगप्रतिकारक प्रतिसादाची जाहिरात केली, परंतु कोविशिल्डमध्ये सेरोपोसिटिव्हिटी रेट आणि मेडियन अँटी-स्पाइक अँटीबॉडी जास्त होते.

यापूर्वी इंडीयन कौन्सिल आॅफ मेडीकल रिसर्च (ICMR)चे प्रमुख डाॅ. बलराम भार्गव यांनी सांगितलं होतं की, कोवॅक्सिनच्या पहिल्या डोसनंतर जास्त अॅंटीबाॅंडीज तयार होत नाहीत, तर दुसरा डोस घेतल्यानंतर जास्त अॅंटीबाॅडीज तयार होतात. त्या तुलनेत कोविशिल्डच्या पहिल्या डोसमध्येच चांगल्या अॅंटीबाॅडीज तयार होतात

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!